पुणे : तिन्ही पत्नींमुळे ताे झाला निराश; युवकाची आत्महत्या, मृतदेहाचा सापडला सांगाडा

पुणे : तीन वेळा विवाह झालेल्या एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना तब्बल महिन्यानंतर उघडकीस आली आहे. खेड तालुक्यातील वाफगाव येथील शेखर शांताराम पवार याने हे टाेकाचे पाऊल उचलले. शेखर याचा मृतदेह आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा येथील डोंगराच्या जंगलात सापडल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

 
याच नैराश्यातून त्याने घर देखील सोडले होते. वडिलांनी त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर वडिलांनी १७ नोव्हेंबर २०२२ ला खेड पोलिसांत शेखर बेपत्ता झाल्याची तक्रार नाेंदवली होती.

पोलिसांनी त्याच शोध घेतला परंतु ताे सापडला नव्हता. दरम्यान आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा गावच्या हद्दीत असणाऱ्या जंगलात एका झाडावर एका मृतदेहाचा सांगाडा लटकल्याचे आढळून आले.

गावचे पोलिस पाटील यांना ही माहिती समजताच त्यांनी याबाबत पोलिसांना तातडीने कळवले. पोलीसांना घटनास्थळी काही कागदपत्र आढळून आली असून त्यातूनच हा शेखर पवार असल्याची माहिती समाेर आली. यानंतर शेखर याच्या कुटूंबियांना कळवण्यात आले. तीन बायका नांदत नसल्याच्या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply