पुणे : जावयाकडून सासूच्या दुचाकीला आग लावण्याचा प्रकार

पुणे : पूर्वी झालेल्या घरगुती वादातून जावयाने सासूची दुचाकी पेटवून देण्याचा प्रकार गंजपेठ येथे घडला. सासूची दुचाकी पेटविली असताना त्याची झळ दुसऱ्या एका महिलेच्या दुचाकीलाही बसल्याने तिचेही नुकसान झाले. या प्रकरणी खडक पोलिसांनी सासूच्या तक्रारीवरील जावयावर गुन्हा दाखल केला आहे.

विशाल अनिल नाईक (रा. गंजपेठ) असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत एका ५० वर्षीय महिलेने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला ही या प्रकरणातील आरोपीची सासू आहे. या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी घरगुती वाद झाला होता. त्याचा राग मनात ठेवून नाईक याने तीन दिवसांपूर्वी दुपारी पावणेचारच्या सुमारास गंजपेठ भागातील मासेआळीमध्ये सासूच्या घराजवळ लावलेल्या दुचाकीला आग लावली.

मासेआळी भागातील वसाहतीमध्ये सासूच्या दुचाकीला आग लावताना त्याने इतर दुचाकींकडे लक्ष दिले नाही. भडकलेली आग सासूच्या दुचाकीजवळ लागलेल्या दुसऱ्या एका महिलेच्या दुचाकीला लागली. त्यात दुसरी दुचाकीही जळाली. या घटनेमध्ये दोन्ही दुचाकीचे सुमारे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नाईक याच्याविरोधात खडक पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply