पुणे : जलपर्णीच्या विळख्याने आरोग्य धोक्यात!

रामवाडी: साईनाथनगर वडगावशेरी नदी पात्रात जलपर्णी वाढल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे त्याच बरोबर डासांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी नदी जलपर्णी मुक्त करावी अशी मागणी स्थानिक रहिवासी कडून केली जात आहे.साईनाथनगर येथे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलेली आहे. नदी काठी मोठय़ा प्रमाणावर वस्त्या आहेत . परिसरात चिलटे माश्या, डास वाढल्याने आजुबाजुला रोगराईत वाढ झाली आहे. नदीकाठी राहणार्‍या वस्ती मधील रहिवाशांना अहोरात्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. जलपर्णी वर डास चिलटे माश्यांचे प्रमाण वाढले आहे. परिसरात महापालिके कडून स्वच्छतेवर भर दिला असताना येथील नागरिकांच्या आरोग्य समस्येकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.परिसरातील नागरिकां मध्ये साथीचे आजार पसरू लागले आहे. विशेषत जेष्ठ नागरिक लहान मुले वारंवार आजारी पडत असल्याने महापालिकेच्या संबंधित यंत्रणे लवकरात लवकर नदीतील जलपर्णी काढावी अशी मागणी रहिवाशांना कडून केली जात आहे.    


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply