पुणे : चारित्र्याच्या संशयातून अभियंत्याकडून पत्नीचा खून; पुण्यातील हडपसर भागातील घटना

पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन अभियंत्या पतीने चाकूने वार करुन तिचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी पतीस हडपसर पोलिसांनी अटक केली. ज्योती राजेंद्र गायकवाड (वय २८, रा. गुरुदत्त कॉलनी, भेकराईनगर, हडपसर ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती राजेंद्र भाऊराव गायकवाड (वय ३१) याला अटक करण्यात आली आहे.

गायकवाड खासगी कंपनीत अभियंता आहे. तो चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा छळ करत होता. सोमवारी (५ डिसेंबर) सकाळी त्यांच्यात वाद झाले. त्याने चाकूने ज्योतीवर वार केले. या घटनेची माहिती रहिवाशांनी हडपसर पाेलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्योतीचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी राजेंद्रला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *