पुणे : चांदणी चौक पूल पाडल्यानंतरच्या वाहतुकीचे नियोजन

पुणे : चांदणी चौकातील पूल पाडण्यापूर्वीच्या कामासाठी आणि पूल पाडल्यानंतर वाहतूक वळवण्याचे नियोजन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) करण्यात आले आहे. त्यानुसार पर्यायी बाह्यवळण मार्गाद्वारे वाहतुकीचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

सद्य:स्थितीत पुलाखालून गेलेल्या महानगरपालिकेच्या जलवाहिन्या स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत जोखमीचे असल्याने त्यासाठी पर्यायी वाहिनी टाकणे, जुन्या वाहिन्या काढणे आदी कामांसाठी वेळ लागत आहे. हे काम पूर्ण होताच नियोजनानुसार प्रत्यक्ष पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जुना पूल अडथळा ठरत असल्याने तो पाडण्यात येणार आहे. दिल्लीतील खासगी कंपनीकडून हे काम केले जात आहे. सध्या पूल पाडण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी संस्थेकडून करण्यात आली असून पूल पाडल्यानंतच्या वाहतुकीचे नियोजन महत्वाचे असून हे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, एनडीए-मुळशी ते बावधन पाषाण वारजे आणि मुळशीकडून पाषाण बावधन कोथरुड वारजेकडे जाणारी वाहतूक नव्याने तयार केलेल्या उड्डाणपुलावरुन सोडण्यात येणार आहे. मुळशीकडून मुंबईच्या दिशने जाणारी वाहतूक मार्गिका तीनमार्गे मार्गिका सातद्वारे सोडण्यात येणार आहे. मुंबई ते बावधन, पाषाण कोथरुड मुंबई ते बावधन, पाषाण ही वाहतूक पाषाण कनेक्टरद्वारे कोथरुड मार्गिकेपासून पुढे खाली सोडण्यात येणार आहे. बावधन, पाषाण ते मुंबई मार्गावरील वाहतूक कोथरुड पाषाण कनेक्टर कोथरुड भूयारीमार्गे वेदविहार एन.डी.ए रस्त्याकडून मुंबई महामार्गावर जोडण्यात येईल. बावधन, पाषाण ते सातारा वारजे मार्गावरील वाहतूक पाषाण कनेक्टरनंतर महामार्गावरून सातारा आणि वारजेकडे सोडण्यात येईल. कोथरुड ते मुंबई दरम्यानची वाहतूक कोथरुड भूयारी मार्ग ते वेदविहार एनडीए रस्त्यावरुन ते महामार्गावर जोडण्यात येईल. कोथरूड ते एनडीए, मुळशी ही वाहतूक कोथरुड भुयारी मार्गानंतर एनडीएवरून मुळशीच्या दिशेने जाईल. कोथरुड ते सातारा, वारजे ही वाहतूक सातारा महामार्ग सेवा रस्त्यावरील श्रृंगेरी मठाजवळून महामार्ग आणि पुढे सातारा व वारजेच्या दिशेने वळविण्यात आली आहे. सातारा, मुळशीकडून येणारी वाहतूक वेदभवन सेवा रस्त्यावरुन एनडीएक चौकातून मुळशीच्या दिशेने सोडण्यात येईल. सातारा ते बावधन आणि पाषाण मार्गावरील वाहतूक मार्गिका सातवरून ते मुळशी रस्त्याच्या दिशेने नव्याने तयार करण्यात आलेल्या उड्डाणपुलावर थेट पाषाणकडे मार्गस्थ होईल. सातारा ते कोथरुड ही वाहतूक वेदविहार सेवा रस्त्यावरुन कोथरुड भूयारीमार्गे सोडण्यात येईल, असे नियोजन एनएचएआयने केले आहे.

पूल पाडणाऱ्या कंपनीकडून पूर्वतयारीचे काम सुरू आहे. ज्या दिवशी पूल पाडण्यात येईल, तेव्हा कशाप्रकारे वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळवावी लागणार आहे. याबाबतता आराखडा वाहतूक पोलीस आणि एनएचएआयने केला आहे. पूर्वतयारी पूर्ण झाल्यानंतर पूल पाडण्याची कार्यवाही केली जाईल. – संजय कदम, प्रकल्प संचालक, एनएचएआय, पुणे विभाग



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply