पुणे : गुंड गज्या मारणे टोळीतील "डॉक्टर डॉन"वर पुणे पोलिसांची कारवाई

पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई झालेल्या गुंड गज्या मारणे याच्या खंडणी प्रकरणात सहभागी असलेल्या कोल्हापूर येथील सराईत गुन्हेगार "डॉक्टर डॉन"ला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथे हि कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान, पोलिस मारणेचा कसून शोध घेत आहेत.

प्रकाश बांदिवडेकर (रा. कोल्हापूर) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. बांदिवडेकर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खून, खंडणी असे दहा ते बारा गुन्हे दाखल आहेत. मरणेच्या टोळीतील सदस्यांनी 8 ऑक्टोबर 2022 रोजी एका व्यावसायिकाचे अपहरण करीत 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यावरून गज्या मारणे, रुपेश मारणे, सचिन घोलप, अमर किर्दत, हेमंत पाटील, फिरोज शेख व अन्य साथीदारांवर अपहरण, मारहाण, खंडणी, जिवे मारण्याची धमकी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चार जणांना अटक केली होती, त्यानंतर गज्या मारणे व त्याच्या 13 साथीदारांवर "मोका" नुसार कारवाई करण्यात आली होती.

गज्या मारणेला आश्रय देणाऱ्यावर "मोका" कारवाई

खंडणी प्रकरणानंतर गुंड गज्या मारणे पसार झाला असून त्याला पकडण्यासाठी गुन्हे शाखेकडून पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, मारणेला आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.

 

Pune Crime : कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीकडून व्यवसायिकाचे अपहरण | Sakal



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply