पुणे गणेशोत्सव २०२२ : अखेर वादात सापडलेल्या 'अफझल खानाचा वध' या देखाव्याला पोलिसांची परवानगी; मंडळाच्या प्रयत्नांना यश

पुणे गणेशोत्सव २०२२ :  पुण्यातील एका गणपती मंडळाच्या जिवंत देखाव्यावरुन वाद पेटला होता. अफझल खानाचा वध या जिवंत देखाव्याला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं नकाराचं कारण देण्यात आलं होतं. मात्र आता याच देखाव्याला पोलिसांनी परवानगी दिली आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास भारतात नाहीतर पाकिस्तानात दाखवायचा का? असा प्रश्न मंडळाकडून निर्माण करण्यात आला होता. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे या संदर्भात मेलद्वारे संपर्क करुन निवेदन पाठवलं होतं. अखेर मंडळाच्या या प्रयत्नांना यश आलं आहे.

सध्या पुण्यात ब्राह्मण महासंघ अनेक प्रश्नांच्या बाबतीत चांगलंच सक्रिय झालं आहे. या देखाव्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी देखील आज कोथरुड पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन दिलं होतं. या देखाव्यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता होती. अनेक स्तरावर या देखाव्यासंदर्भात बोललं गेलं होतं. मात्र आता हे गणपती मंडळ अफझल खानाचा वध हा जिवंत देखावा साकारणार असल्याचं, मंडळाचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी सांगितलं आहे. 

आदित्य ठाकरेंनीदेखील प्रश्न उपस्थित केला होता.
शिंदे फडणवीसांचं तत्पुर्त असलेल्या सरकारकडून वारंवार हिन्दूत्ववादी सरकार असल्याचं भाष्य केलं जात होतं. याच सरकारमध्ये जर शिवरायांच्या प्रतापाचा इतिहास दाखवण्यासाठी विरोध होत असेल तर  ही गोष्ट फार चिंताजनक आहे. स्वत:ला हिन्दूत्ववादी म्हणता मग महाराजांचा इतिहास दाखवायला विरोध का करता?, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

नक्की काय होतं प्रकरण?
पुण्यातील कोथरुडमधील संगम चौकातील गणपती मंडळ उत्तम आणि क्रिएटीव्ह देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. यंदा या मंडळाने 'अफझल खान वध' हा ऐतिहासिक जिवंत देखावा साकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या देखाव्याला पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत या मंडळाला संबंधित देखावा उभारण्यास परवानगी नाकारली होती. त्यामुळे मंडळाने नाराजी व्यक्त केली होती. देखाव्या वरुन कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार असेल तर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता होती. पुण्यात दोन वर्षांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने होणार असल्याने मंडळाचे कार्यकर्ते उत्साहात होते मात्र पोलिसांकडून काही निर्णय नाकारण्यात आल्याने मंडळांमध्ये नाराजीचा होता

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply