पुणे : गजा मारणे टोळीतील सराईत गुन्हेगार रुपेश मारणेला साथीदारासह अटक ; मुळशीत गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : गुंड गजा  मारणे याच्या टोळीतील फरार सराईत गुन्हेगार रुपेश मारणे याला साथीदारासह पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुळशी परिसरातून रात्री अटक केली आहे. रुपेश मारणे आणि संतोष शेलार अशी अटक केलेल्या दोघा फरार गुंडाची नावे आहेत. सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर आणि  पथकाने ही कारवाई केली.

शेअर बाजारात गुंतवलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्यासाठी शेअर दलालाचे अपहरण करुन त्याला मारहाण केल्या प्रकरणी  गुंड गजा मारणे याच्यासह १५ जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाई केली. गजा  मारणे याला अटक करण्यात आली आहे. रुपेश मारणे आणि  साथीदार फरार होते. एका व्यावसायिकाने बांधकाम व्यवसायासाठी १ कोटी ८५ लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात २ कोटी ३० लाख रुपये परत दिले होते. तरीही आणखी ६५ लाखांची मागणी करुन या व्यावसायिकाला धमकाविले जात होते. याप्रकरणी रुपेश मारणेसह चौघांवर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *