पुणे : कौटुंबिक वादातून भावजयीचा खून; वडगाव शेरी भागातील घटना; दीर अटकेत

पुणे : दिराने भावजयीवर चाकूने वार करुन तिचा खून केल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. या प्रकरणी दिराला दत्तनगर पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मीबाई श्रीराम (वय ५४, रा. विडी कामगार वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दीर श्रीनिवास श्रीराम याला अटक करण्यात आली आहे. सागर रमेश दासा (वय ३९, रा. मारुतीनगर, वडगाव शेरी) याला अटक करण्यात आली. लक्ष्मीबाई आणि श्रीनिवास यांच्यात वाद होते. सागर हा श्रीनिवास याचा मित्र आहे. शुक्रवारी (११ नोव्हेंबर) दुपारी सागर याच्या घरी धार्मिक कार्यक्रम होता. त्याने लक्ष्मीबाई यांना घरी बोलावले होते. सागर आणि त्याची पत्नी कामानिमित्त बाहेर गेले होते. त्या वेळी श्रीनिवासने लक्ष्मीबाई यांच्यावर चाकूने वार करुन खून केला.

सागर आणि त्याची पत्नी घरी आले. तेव्हा लक्ष्मीबाई गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे त्यांनी पाहिले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त किशोर जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. चौकशीत श्रीनिवासने भावजय लक्ष्मीबाईचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरविंद कुमरे, हवालदार सचिन कुटे, रामचंद्र गुरव, नानासाहेब पतुरे, शेखर शिंदे, अनुप सांगळे आदींनी पसार झालेल्या श्रीनिवासला पकडले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply