पुणे : कोरेगाव पार्क परिसरात मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय :गुन्हे शाखेचा छापा; ११ जणांवर गुन्हा

पुणे : कोरेगाव पार्क परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाई ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार तरुणींना ताब्यात घेण्यात आले.

कोरेगाव पार्कमधील नॅार्थ मेन रस्ता परिसरात गोल्डन ओक स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून शहानिशा केली. खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत मसाज सेंटरमधील व्यवस्थापक काबुल हुसेन अमीर अली चौधरी (वय २६), महंमद फुजेल अहमद सिरीजुल हक (वय २२), जुनेल हुसेन इसाक अली (वय ३२), राय सॅालोमन (वय २६), विजय सुनील पवार (वय २२), स्टिफन रांग (वय २५) यांना अटक करण्यात आली.

या प्रकरणी मसाज सेंटरचा व्यवस्थापक अमोल दिलीप रामागडे (वय ४२), मालक नौशाद शेख, सुधीर पाटील, राजू शेडगे, अमित प्रताप डोमाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी दिली.पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, राजश्री मोहिते, नीलम शिंदे, हनुमंत कांबळे, इरफान पठाण आदींनी ही कारवाई केली.

आरोपींनी समाजमाध्यमावर मसाज सेंटरची जाहिरात केली होती. महाविद्यालयीन युवतींना पैशांचे आमिष दाखवून आरोपींनी त्यांना वेश्या व्यवसायात ओढले होते. समाजमाध्यमावर जाहिरातबाजी तसेच छायाचित्रेही प्रसारित केली जात होती.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *