पुणे : कोथरुडमधील खचलेले रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी ; महापालिका आयुक्तांना पत्र

पुणे : पावसामुळे कोथरूड परिसरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. त्यामुळे कोथरूडमधील रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांना चंद्रकांत पाटील यांनी पत्र दिले आहे.

शहरात गेल्या आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असून, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे; तर काही ठिकाणी रस्ते खचले असल्याचे दिसून येत आहे. पावसाने प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक, भेलकेनगर चौक, राहुलनगर, नवीन शिवणे, कर्वेरोड, आशिष गार्डन चौक, गुजराथ कॉलनी परिसर, नळस्टॉप चौक (एसएनडीटी चौक- कॅनॉल रोड), पौड फाटा, सदानंद हॉटेलसमोरील बाजू, चांदनी चौक आयटी पार्क समोर, कोथरुड डेपो, मातोश्री वृद्धाश्रमजवळील रस्ता, पौड रोड आनंदनगरसमोरील बाजू, यांसह विविध भागांतील रस्ते मोठ्या प्रमाणात खचले आहेत. याशिवाय काही ठिकाणी सिमेंट रस्त्या लागतचे डांबरी रस्ते खचून असमान झाले आहेत.

या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा सदर रस्त्यांवर एखादा मोठा अपघात होऊन, जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तरी संभाव्य शक्यताची भीषणता लक्षात घेऊन कोथरूड भागातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, असे या पत्रात पाटील यांनी नमूद केले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply