पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभियंत्यावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे - मार्केट यार्डातील कामांचे बिल मंजुरीसाठी बांधकाम व्यावसायिकाकडे दोन लाखांची लाच (Bribe) मागितल्या प्रकरणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे (APMC) कार्यकारी अभियंता (Engineer) आणि उपअभियंत्यावर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी अभियंता प्रमोद कृष्णराव तुपे यांच्यासह उपअभियंता अरविंद दामोदर फडतरे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमांन्वये ही कारवाई करण्यात आली.

याबाबत 26 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वच्छतागृह व उद्योग भवन स्लॅबचे वॉटर प्रुफिंगचे काम केले होते. या दोन कामांचे बील मंजूर करण्यासाठी बिलाची 15 टक्के रक्कम मागण्यात आली होती. त्यामुळे याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पडताळणीमध्ये तुपे व फडतरे यांनी दोन लाख रूपयांच्या लाचेची मागणी केल्याचे आढळून आले. पोलिस उपअधीक्षक विजयमाला पवार यांनी ही कारवाई केली. उपअधीक्षक सीमा आडनाईक या गुन्ह्याचा तपास करीत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply