पुणे : किरकोळ वादातून मित्राचा खून; हडपसरमधील घटना; दोघांवर गुन्हा

पुणे : किरकोळ वादातून मित्राला बेदम मारहाण करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना हडपसरमधील मांजरी परिसरात घडली. या प्रकरणी दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर गिरीधर दासमे (वय २७, रा. मांजरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी गौरव कारकिले आणि राजू सोनवणे (दोघे रा. महादेवनगर, मांजरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर दासमेचा लहान भाऊ लखन (वय २६) याने या संदर्भात फिर्याद दिली आहे. सागर, गौरव, राजू मित्र आहेत. ते रंगकाम करतात. किरकोळ कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. वादातून आरोपी गौरव आणि राजूने सागरला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सागरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करत आहेत.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply