पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील सोडतीत (लॉटरी) निवड झालेल्या बालकांपैकी आत्तापर्यंत राज्यात ५१.८२ टक्के बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर पुणे जिल्ह्यात प्रवेशासाठी निवड झालेल्यांपैकी ५१.४९ टक्के बालकांचे प्रवेश आत्तापर्यंत निश्चित झाले आहेत. निवड झालेल्या बालकांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी पालकांना येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २९) मुदत आहे.
आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येते. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेतील सोडत यापूर्वी जाहीर झाली आहे. राज्यातील नऊ हजार ८६ शाळांमधील एकूण एक लाख एक हजार ९०६ जागांसाठी एकूण दोन लाख ८२ हजार ७८३ अर्ज आले होते. त्यापैकी सोडतीत राज्यातून ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्यातील ४६ हजार ९९५ विद्यार्थ्यांचे आत्तापर्यंत प्रवेश निश्चित झाले आहेत. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ९५७ शाळांमधील १५ हजार १२६ जागांसाठी ६२ हजार ९६० अर्ज आले होती. त्यातील १४ हजार ९५८ विद्यार्थ्यांनी सोडतीत निवड झाली असून त्यातील सात हजार ७०३ विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप निश्चित झाले आहेत.
पालकांसाठी सूचना :
- प्रतीक्षा यादीत नाव असणाऱ्या पालकांनी आता ॲडमिट कार्डची प्रिंट काढू नये.
- प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ‘आरटीई पोर्टल’वर स्वतंत्रपणे सूचना देण्यात येतील.
- प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशासाठी पडताळणी समितीकडे जाऊन पालकांनी प्रवेशाची प्रक्रिया करावी
- लॉटरी लागलेल्या बालकांच्या पालकांनी ॲलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी
- ॲलॉटमेंट लेटर आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन जवळील पडताळणी केंद्रावर जावे आणि आपला प्रवेश निश्चित करावा
- पडताळणी केंद्रावर प्रवेश निश्चित झाल्याची रिसीट घेऊन मग शाळेत जावे.
आतापर्यंत निश्चित झालेल्या प्रवेशाचा आढावा :
जिल्हा : आरटीई शाळा : प्रवेशासाठी उपलब्ध जागा : एकूण आलेले अर्ज : सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या : आत्तापर्यंत निश्चित झालेले प्रवेश
पुणे : ९५७ : १५,१२६ : ६२,९६० : १४,९५८ : ७,७०३
ठाणे : ६४८ : १२,२६७ : २५,४१९ : १०,४२९ : ५,८५७
नागपूर : ६६३ : ६,१८६ : ३१,४११ : ६,१०६ : ३,००२
नाशिक : ४२२ : ४,९२७ : १६,५६७ : ४,५१३ : २,५५१
जळगाव : २८५ : ३,१४७ : ८,३५४ : २,९४० : १,८६१
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




