पुणे : आपत्ती व्यवस्थापन काळात :दुर्गम भागात तातडीने औषधे ,रक्त पोचणार;ड्रोन

मंचर: दुर्गम भागात तातडीने आवश्यक वैद्यकीय औषधे, रक्त, अवयव व वस्तूचे वितरण ड्रोनद्वारे पोहचवण्याचे तंत्रज्ञान आगामी काळात उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे अनेकांना वेळेत वैद्यकीय मदत मिळणार असून लाखो लोकांचे प्राण वाचणार आहे. या आधुनिक ड्रोन तंत्रज्ञान प्रयोगाची चाचणी अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात बुधवारी (ता.३०) झाली. २० ते २५ किलो वजन वाहून नेण्याची क्षमता असून ३० किलोमीटर अंतरापर्यत ड्रोन ये-जा शकतो.

वोलर अल्टा केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या भागीदारीने व युके सरकारच्या सहकार्याने ड्रोन आधारित एंड-टू-एंड टेक्नॉलॉजी सोल्यूशन संजीवन भारत उपक्रम राबविला जाणार आहे. एरोस्पेस-ग्रेड अॅल्युमिनियम मिश्र धातुपासून ड्रोन बनवलेले हलके-वजन कंटेनर IOT-सक्षम लॉकिंग यंत्रणा व पेल्टियर सिस्टमसह सुसज्ज आहे. एकाच ड्रोन फ्लाइटमध्ये शीत साखळी राखून अनेक वैद्यकीय जीवनावश्यक वस्तूंचे वितरण होणार आहे. त्यासाठी भारत व युके हे दोन देश एकत्र आले आहेत.

चाचणी प्रसंगी मुंबईतील ब्रिटीश उच्चायुक्त कार्यालयाच्या उपप्रमुख कॅथरीन बार्न्स, डॉ संजय जुवेकर, निहारिका कोलते-आळेकर, डॉ मोहन गुप्ते ,डॉ धीरज अग्रवाल, डॉ ऋतूजा पाटील, डॉ गिरीश दायमा, डॉ मकरंद घोरपडे, शिरीष कथले यांनी ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली. यावेळी निरगुडसरच्या सरपंच उर्मिला वळसे पाटील, अवसरी खुर्दचे सरपंच जगदीश अभंग, उपसरपंच स्नेहा टेमकर, माजी सरपंच संगीता शिंदे, शकुंतला शिंदे, धोंडिभाऊ शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गाढवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा शिंदे,डॉ.एस.बी रणखांब उपस्थित होते.

“मी पाहिलेले ड्रोन तंत्रज्ञान दुर्गम समुदायांना आवश्यक वैद्यकीय पुरवठा करण्याच्या आपल्या क्षमतेमध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते. या तंत्रज्ञानामध्ये लाखो जीव सुधारण्याची आणि वाचवण्याची क्षमता आहे. ब्रिटीश आणि भारताच्या पंतप्रधानांनी मान्य केलेल्या यूके-इंडिया 2030 रोडमॅपशी सुसंगती साधत अशा तंत्रज्ञानाच्या विकासाला पाठिंबा दिल्याबद्दल यूके सरकारला अभिमान आहे. अशा प्रकारच्या अत्याधुनिक व अभिनव उपक्रमात आघाडीवर असलेल्या वोलर अल्टा चे मी अभिनंदन करते

कॅथरीन बार्न्स ड्रोन उपप्रमुख मुंबई ब्रिटीश उच्चायुक्त

अवसरी खुर्द (ता.आंबेगाव): प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात अत्यावश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध होण्यासाठी आधुनिक ड्रोन तंत्रज्ञान प्रयोग चाचणी प्रसंगी उपस्थित मान्यवर.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply