पुणे : आंबेगावात लग्नाचा बनाव करून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नववधुसह चोघांना अटक

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील भराडी गावात लग्नाचा खोटा बनाव करून लग्नानंतर अवघ्या आठवड्यात नवरदेवाच्या वडिलांकडून लग्नासाठी घेतलेले एक लाख ३० हजार रुपये तसेच दागिने

घेवुन नववधू सह पळुन जाण्याचा तयारीत असलेल्या टोळीला पारगाव कारखाना पोलिसांनी साफळा रचून सुमारे २० ते ३० मीटर पळत जाऊन शिताफीने नववधू सह, एक महिला व दोन पुरुष यांना अटक केली आहे. एकूण सहा जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पारगाव कारखाना पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार व गणेश खंडू बांगर ( रा. भराडी ता. आंबेगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश बांगर यांच्या वडिलांनी ओळखीचे वसंत किसन थोरात (रा. मंचर ) यांना गणेश साठी लग्नाला मुलगी बघण्यास सांगितले दि. २२ डिसेंबर रोजी वसंत थोरात हे एक पुरूष व तीन महिलासह भराडी येथे आले गणेश बांगर यांच्या घरात मुलगा

मुलगी पहाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर लग्न जमवण्याची बैठक घेतली मुलगी शीतल हि अनाथ असून तिचा सांभाळ आम्ही केला असून लग्न जमविण्यासाठी मुलीकडील लोकांना दीड लाख रुपये द्यावे लागतील असे मध्यस्थाने सांगितले सध्या लग्नासाठी मुली मिळत नसल्याने बांगर कुटुंबानेही एक लाख ३० हजार रुपये देण्याचे कबूल केले

पौष महिना लागत असल्याने त्याच दिवशी सायंकाळी मुलगा गणेश व मुलगी शीतल यांचे घरातच हार घालून घरगुती लग्न लावले मुलाचे वडील यांनी नातेवाईकडून एक लाख रुपये उसने घेऊन व स्वताकडील ३० हजार रुपये असे एकूण एक लाख ३० हजार रुपये मध्यस्थाला दिले

दुसऱ्या दिवशी दि.२३ रोजी मंचर येथील एका मंगल कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह करून वकिलांकडे नोटरी हि करण्यात आली नववधू शीतल हिच्या कडे मोबाईल नसल्यामुळे मुलगा गणेश याच्या मोबाईल वरून ती तिची मावशी बरोबर बोलत होती.

शीतल हिचे वागणे संशास्पद वाटल्याने मुलगा गणेश याने मोबाईल मध्ये रेकार्डिंग सुरु केले मुलगी शीतल हि नातेवाईकांच्या बरोबर बोलत असताना लग्नाची पूजा झाल्यानंतर दागिने घेऊन गुजरातला पळून जाण्याचा शीतल कट रचत असल्याचे मोबाईल मध्ये रेकार्डिंगवरून समजल्यावर गणेश बांगर यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.

नववधू शीतल हि काल शुक्रवार दि. ३० रोजी मंचर येथील संभाजी चौक येथे नातेवाईकांना भेटायला गेली असता पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहुजी थाटे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस हवालदार देवानंद किर्वे, अविनाश कालेकर,चंद्रकांत गव्हाणे, श्यामल तळेकर, निशा गुळवे असे सर्वजण संभाजी चौकात साफळा रचून थांबले असता मुलगी शितल रमेश खुडे हिला भेटण्यासाठी एक महीला व एक पुरुष आले. ते सदर ठिकाणी आपापसात काहीतरी बोलत होते.

पोलीस आरोपींच्या दिशेने चालत जावु लागले असता आरोपींना संशय आल्यामुळे ते तेथुन पळुन जावु लागले पोलिसांनी २० मीटर पळत जाऊन त्यांना पकडले. लता अविनाश कोटलवार ( वय 51 वर्षे ) मनोज अविनाश कोटलवार ( वय 24 वर्षे सध्या रा इंदीरानगर, आळंदी ता. खेड, मुळ रा. नांदेड) असल्याचे समजुन त्याचाही नमुद गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply