पुणे : अंत्यविधीवेळी रॉकेलच्या कॅनचा भडका उडून ११ जण भाजले

मुंढवा : दिपक प्रकाश कांबळे वय ४५ रा. महात्मा फुले वसाहत, ताडीवाला रोड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या अंत्यविधीसाठी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास कैलास स्मशानभूमी मध्ये नेले. अंत्यविधी करीत असताना सरणावरील लाकडांनी लवकर पेट घ्यावा म्हणून कॅनमधून रॉकेल टाकत असतांना, रॉकेलच्या कॅनने पेट घेतला आणि पेट घेतलेली कॅन त्या माणसाने सोडून दिली. त्यामुळे अधिकच भडका उडून त्यात ११ जण भाजले असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.

भाजल्यांमध्ये सर्वच मयताचे जवळचे नातेवाईक आहेत. यात आशा प्रकाश कांबळे वय ५९ रा. विकास नगर, घोरपडी गाव मयताची आई, येणाबाई बाबू गाडे वय वय ५० विकास नगर बौद्ध विहार जवळ घोरपडी गाव मयताची सासू, निलेश विनोद कांबळे वय ३५ रा. घोरपडी गाव, मयताच्या बायकोचा चुलत भाऊ, शिवाजी बाबुराव सूर्यवंशी रा. ताडीवाला रोड, वसंत बंडू कांबळे रा. दत्तनगर चिंचवड, दिगंबर श्रीरंग पुजारी रा. विकास नगर घोरपडी, हरीश विठ्ठल शिंदे वय ४० रा. पांढरेमळा हडपसर, आकाश अशोक कांबळे रा. भिमनगर घोरपडी,शशिकांत कचरू कांबळे ३६ प्रायव्हेट रोड, ताडीवाला रोड, अनिल बसन्ना शिंदे रा. प्रायव्हेट रोड ताडीवाला रोड, अनिल नर्सिंग घटवळ रा. सिद्धेश्वर तरुण मंडळ जवळ ताडीवाला रोड हे सर्वच सुमारे ३० ते ३५ टक्के भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास साह. पोलिस निरिक्षक हरिष ठाकूर करीत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply