पुणे - एरव्ही बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत प्रवाशांना (Passenger) १० ते १२ मिनिटे वाट पहावी लागत. मात्र, सोमवारी पुण्यातील हजारो प्रवाशांना सुखद अनुभव आला. अवघ्या पाच मिनिटांच्या आतच त्यांना बस (Bus) उपलब्ध होत होती. त्यामुळे बस थांब्यावरची गर्दी कमी झाली. निमित्त होते पीएमपीच्या ‘बस डे’चे. (PMP Bus Day) यानिमित्ताने पीएमपीने १८५३ बसेस रस्त्यावर उतरविल्या अन प्रवाशांचा प्रवास आनंददायक झाला. सोमवारी ‘बस डे’च्या निमित्ताने सकाळपासून पीएमपीच्या विविध बस डेपोत कर्मचाऱ्यांची वर्दळ सुरु होती. काही गाड्या सजविल्या गेल्या. अधिकाऱ्यांपासून डेपोतील सर्वच कर्मचारी सकाळीच कामावर हजर झाले. परिणामी, प्रवाशांना वेळेत व गतिमान सेवा देणे शक्य झाले. घोले रोड येथील कार्यक्रमात मान्यवरांनी पीएमपीला हिरवा झेंडा दाखविला. एकाचवेळी १८५३ गाड्या रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. एरव्ही बसमध्ये चढण्यासाठी होणारी गर्दी, बस थांब्यावर वाट पाहण्याऐवजी पुणेकरांना लगेचच बस उपलब्ध होत असल्याचा चांगला अनुभव आला.
पीएमपीने ‘बस डे’ला सुरुवातीला १८०० गाड्या रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला. मात्र, सोमवारी १८५३ गाड्या सोडल्या, याचा प्रवाशांना फायदाच झाला. १२ लाख प्रवाशांचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रवाशांचा निश्चित आकडा जरी उपलब्ध नसला तरीही उद्दिष्टापेक्षा जास्त प्रवासी संख्या असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले.
पिंपरी - सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व प्रवाशांना पटवून देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने पिंपरी-चिंचवड शहरात आज (ता. १८ ) ‘बस डे’ साजरा केला आहे. पीएमपीने जागरूकतेसाठी शहरात विविध फलक लावले होते. प्रवाशांमध्ये कूपनचे वाटप करून, जागृती करण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजनही केले होते.
पीएमपीच्या सध्या सरासरी रोज १५५० बस मार्गांवर धावतात. सध्या पीएमपीने प्रवास करणारे रोजचे सुमारे १० लाख ५० हजार प्रवासी आहेत. या निमित्ताने सोमवारी १८६० बसगाड्या रस्त्यावर धावल्या. ठिकठिकाणी कर्मचाऱ्यांनी लकी ड्रॉ काढण्यासाठी प्रवाशांमध्ये कूपनचे वाटप केले. वर्धापन दिनामित्त आणि ‘बस डे’ साठी पीएमपीने जागरूकतेसाठी शहरात विविध फलक लावलेले होते. तसेच कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजनही केले होते. तरुण प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सध्या प्रायोगिक तत्त्वावर मोफत वाय फाय इंटरनेट सेवा देण्यात आली होती. बस डेनिमित्त प्रवाशांना तिकीट दरात विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांचा विशेष डेटा एकत्रित केला जात आहे पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) १९ एप्रिल रोजी वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने १४ ते २३ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ एप्रिलला बस सेवांची माहिती देणारे प्रदर्शन देखील निगडी, भक्ती-शक्ती येथील चौकांमध्ये दाखविणार आहे. मंगळवारी पिंपरीत ५ आणि १० रूपयांत प्रवास करता येणार आहे. बुधवारी ६० रुपयांचा दैनिक प्रवासाचा पास महिलांना अवघ्या १० रूपयांत मिळणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी सतीश घाटे यांनी दिली.
शहर
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
महाराष्ट्र
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
गुन्हा
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम



















Subscribe to my channel




