पिंपरी- चिंचवड : खळबळजनक! मटणाच्या सुपमध्ये भात आल्याने केला वेटरचा खून

पिंपरी- चिंचवड: पिंपरी- चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथे अत्यंत किरकोळ कारणावरून मटण खानावळीतील १९ वर्षीय वेटरचा खून करण्यात आला आहे. मटणाच्या सूपमध्ये भात आला या कारणावरून दोन तरुणांनी वेटरला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत एकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला असून दोघे जण जखमी आहेत. आरोपी फरार असून सांगवी पोलिस या आरोपींचा शोध घेत आहेत. 

मंगेश संजय पोस्ते वय- १९ असे खून झालेल्या वेटरचे नाव आहे. तर, अजित अमूत मुठकुळे वय- ३२, सचिन सुभाष भवर वय- २२ अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. विजयराज वाघिरे आणि त्याचा साथीदारावर खुना प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल महादू रजाळे यांनी सांगवी पोलिसात तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथे एक मटण खानावळ आहे. तिथे आरोपी विजयराज आणि त्याचा मित्र हे नेहमी जेवायला जायचे परंतु, मंगळवारी मटणाच्या सूपमध्ये भात आला यावरून आरोपी विजयराज आणि त्याच्या साथीदाराने वेटर अजित अमूत मुठकुळे, सचिन सुभाष भवर आणि मयत मंगेशला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. हॉटेलची सर्व्हिस चांगली नाही. जेवण ही चांगले देत नाही म्हणत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यात मंगेशचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.  



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply