पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली, अंकुश शिंदे नवे पोलीस आयुक्त

   

पुणे : मुंबईचे विशेष सुधार सेवेचे पोलीस महासंचालक अंकुश शिंदे यांची पिंपरी-चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर पिंपरी-चिंचवडचे सध्याचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असणारे कृष्ण प्रकाश यांची व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारीच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ झाली होती. त्या विरोधात कृष्णप्रकाश यांनी कठोर कारवाईची भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतरही शहरातील गुन्हेगारीच्या घटनांवर पोलिसांना नियंत्रण ठेवण्यास अपयश येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. दरम्यान, गुन्हेगारी घटनांना आळा बसवण्यास अपयशी ठरल्यानेत कृष्ण प्रकाश यांची बदली केल्याची चर्चा पोलीस दलात केली जात आहे.

नियुक्तीचे आदेश राज्याच्या गृहविभागाने आज बुधवारी (ता.२०) काढले आहे. एकूण १४ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यात लखमी गौतम, संदीप कर्णिक, सत्य नारायण, प्रविणकुमार पडवळ, एस.जयकुमार, निशिथ मिश्रा, सुनिल फुलारी, संजय मोहिते, सुनिल कोल्हे, दत्तात्रय कराळे, प्रवीण आर. पवार, बी.जी.शेखर, संजय बाविस्कर, संजय नाईकनवरे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कृष्ण प्रकाश यांनी आयपीएसमधील पहिले आयर्नमॅन पद मिळविल्याने ते अनेकांचे आयडाॅल झालेले आहे. महाराष्ट्र पोलिस दलात रुजू झाल्यापासून त्यांनी हैदराबाद, गडचिरोली, नांदेड, मालेगाव, बुलडाणा, अमरावती, सांगली, नगर, मुंबई, पुणे गुन्हे अन्वेषण विभाग या ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply