पिंपरीत 9 वर्षांच्या मुलाची डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून हत्या

पिंपरी - सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून नऊ वर्षीय मुलाचा खून केल्याची घटना चिखली येथे घडली. पोलिस आरोपीच्या मागावर आहेत. लक्ष्मण देवासी (वय ९,रा. हरगुडे वस्ती) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. लक्ष्मण याचा मृतदेह एका पडक्या घरात सापडला. डोक्यात सिमेंट ब्लॉक घातल्याने गंभीर इजा झाली होती. यामध्येच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठवला . दरम्यान, खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला याचा शोध सुरू आहे. चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *