परभणी : म्हशीला वाचविण्याच्या प्रयत्नात चारचाकीचा भीषण अपघात; ७ जण जखमी, परभणीतील घटना

परभणीतून अपघाताचं वृत्त समोर आलं आहे. जिंतूर-परभणी रस्त्यावरील चांदज गावाजवळ वेगाने चारचाकी वाहनासमोर म्हैस आल्याने चालकाने तिला वाचवण्याच्या नादात अपघात झाला. ही घटना आज, मंगळवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. या अपघातात ७ जण जखमी झाले. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात दाखल करण्यात आले आहे.

जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर येथील काही नागरिक परभणी येथे कामानिमित्त खासगी चारचाकी वाहन करुन गेले होते. काम संपल्यानंतर जिंतूरकडे परत येत असताना चांदजजवळील रस्त्यावर अचानक म्हैस वाहानासमोर आली. त्यामुळे चालकाने म्हैस वाचवण्याच्या नादात ब्रेक दाबल्याने वाहन उलटले. या अपघातात चालकासह ६ जण जखमी झाले. अपघाताची मिळताच १०८ रुग्णवाहिका चालक साजिद अन्सारी डॉ. अरुण लहाने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातात खासगी वाहन चालक आनीस खान महबूब खान पठाण (वय ४४, रा.जिंतूर),रामचंद्र किशन बिरगडे (वय ४५), मारोतराव रामराव माने (वय ७०),अच्युत विश्वनाथ थोरात (वय ४५), विजय गुलाब गडदे (वय ३५), देविदास विठोबा गडदे (वय ६३, सर्व रा. माणकेश्वर (चा.) व निवृत्ती नामदेव बनगर (वय ४५ रा. जिंतूर) या सात जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

डॉ.श्रीमती दिपा परिहार, सिस्टर श्रीमती कांबळे,श्रीमती राठोड, रुग्णकक्षसेवक गंगाधर पालवे, आदींनी प्राथमिक उपचार केले. यातील निवृत्ती बनगर,चालक अनिस खान,विजय गडदे या तीन जणांना गंभीर मार लागल्याने त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply