पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:वाद, सहकार्य आणि ‎एकांतामुळे एकटेपणा संपतो‎

एका छताखाली अनेक सदस्य राहत असले, तरीही त्यांपैकी काहींना‎आपण एकटे आहोत, असे वाटू शकते. बाह्य जगात लोकप्रियता व‎प्रतिष्ठा असूनही काही लोकांना एकटेपणा जाणवतो. जे लोक सतत‎गराड्यात असतात, त्यांनाही एकटेपणा छळतो. त्यामुळे हे समजून घेतले‎पाहिजे की, एकटेपणा ही परिस्थिती नसून आजार आहे. तो दीर्घकाळ‎टिकला, तर नैराश्य येते . म्हणूनच एकाकीपणावर वेळीच उपचार केले‎ पाहिजेत. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की, एकटेपणा ही एक भावना आहे.‎तुम्ही ती जितकी जास्त अनुभवाल, तितकी ती वाढत जाईल. आणि हे‎देखील निश्चित आहे की ही भावना पूर्णपणे संपणार नाही, तर या‎अनुभूतीचे तोंड आपल्याला अन्यत्र वळवावे लागेल. त्यासाठी आधी हे‎काम करा की, इतरांशी मनमोकळेपणाने बोला. यामुळे आपण हलके‎होतो. मनावरील ओझे एकाकीपणाला खतपाणी घालत असते. दुसरे‎म्हणजे, लोकांना भरपूर मदत करा. सहकार्याची वृत्ती एकटेपणामध्ये‎आनंद भरते. तिसरे काम म्हणजे, एकाकीपणाला एकांताशी जोडा.‎एकटेपणा आपण इतरांच्या सोबतीने मिटवतो, पण एकांतात आपण‎परमात्म्याशी जोडले जातो. ‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *