पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:जगावर विचार करा आणि देवावर विश्वास ठेवा

सध्या मोठा संभ्रम निर्माण झाला आहे, तो म्हणजे आपण जगावर विश्वास ठेवतो व देवावर विचार करतो. आज आपल्या सभोवताली जे काही घडत आहे, विशेषतः विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत, त्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. पण देव आहे की नाही, तो कृपा करतो की नाही, यावर आपण खूप विचार करतो. जगभरातील शास्त्रज्ञ स्वतःच त्यांच्या शोधांच्या धोक्यांबद्दल म्हणतात की, विज्ञान जबाबदार हातांमध्ये सुरक्षित राहील, अन्यथा ते नुकसान करेल. पण जबाबदार कोण आहे? जो तो विज्ञानाचा गैरवापर करण्यातच मग्न आहे. आजकाल तर कुटुंबाचा विचारही लोकांना त्यांच्या वैयक्तिक आनंदात अडथळा वाटतो. पूर्वी कुटुंबात राहण्याचा अर्थ कायमस्वरूपी नातेसंबंध व जबाबदारी असा होता; पण आता चहुबाजूला बेजबाबदारपणाचेच चित्र निर्माण झाले आहे. घराबाहेर सरकारने दान देऊन बेजबाबदारांची फौज उभी केली आहे आणि घरात संस्कारांच्या अभावामुळे सदस्य बेजबाबदार झाले आहेत. या दोन्ही स्थितींचा आनंद विज्ञान, तंत्रज्ञान घेत आहेत.

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *