नाशिक : शहरातील गुढीपाडव्याच्या सांस्कृतिक परंपरेला शहर पोलिसांकडून अपशकुन लावला जातो आहे. राज्यात डोंबीवली, दादरसह अन्य ठिकाणांवर परवानग्या मिळत असतांना नाशिकमध्ये पोलिसांकडून अडवणूक होते आहे. ५ मार्चला परवानगी अर्ज सादर केलेला असतांना अद्याप कुठलीही परवानगी दिलेली नाही. पोलिसांच्या या मोगलाई धोरणामुळे नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे आयोजित केलेले महावादन, महाअंतरनाद व महारांगोळी हे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करत असल्याचा खेद नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी व्यक्त केले.
शंकराचार्य न्यास संकुल येथे झालेल्या पत्रकार परीषदेत श्री.संचेती यांनी नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक यांची भुमिका मांडली. पत्रकार परीषदेस नववर्ष स्वागत समितीचे सचिव जयंत गायधनी, राजेश दुरगुडे, शिवाजी बोंदार्डे, नितीन वारे, नितीन पवार, सुमुखी अथनी, निनाद पंचाक्षरी, केतकी चंद्रात्रे, नीलेश देशपांडे, भारती सोनवणे आदी उपस्थित होते. गोदाकाठावरील पाडवा पटांगणावर होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत. नववर्ष स्वागत यात्रेचेही आयोजन समितीमार्फत केले जाणार नाही. मात्र जनता ठरवेल, त्या दिशेने नववर्ष स्वागत यात्रेचा विषय जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
अधिक माहिती देतांना श्री.संचेती म्हणाले, की एक खिडकी योजनेअंतर्गत ५ मार्चला परवानगीसाठी अर्ज केलेला होता. अनेकवेळा पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेण्यासाठी तासंतास प्रतीक्षा केली. असे असूनही कधी लेखापरीक्षण अहवाल (ऑडीट रिपोर्ट) तर कधी अन्य कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले गेले. सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनही परवानगी दिली जात नसल्याचा खेद त्यांनी व्यक्त केला.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




