नागपूर : १००० किलोहून अधिक गांजा जप्त; सेंद्रीय खतांच्‍या ट्रकमधून वाहतूक

नागपूर : नागपूरच्या सीमेवर सेंद्रिय खतांनी भरलेल्या एका ट्रकमधून 1000 किलो पेक्षा जास्त गांजा जप्त केला आहे. नागपूर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने आज पहाटे नागपूरच्या कापसी परिसरात ही कारवाई केली आहे.

ओडिशामधून सेंद्रिय खत घेऊन निघालेल्या ट्रकमध्ये सेंद्रिय खताच्या शेकडो पोत्यांमध्ये गांजाचे जवळपास 50 पोते लपवून ठेवण्यात आले होते. पोलिसांना या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी विशेष प्रशिक्षित केनाईन डॉगच्या मदतीने या ट्रकची तपासणी केली. त्यामध्ये एक हजार किलो पेक्षा जास्त गांजा सापडला आहे.

याप्रकरणी नागपूर पोलिसांच्या माहितीवर बीडमध्येही दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ट्रकमध्ये लादलेले सेंद्रिय खत शिर्डीला पाठवण्यात येत होते. त्यामुळे शिर्डीमध्येही यासंदर्भात पोलीस तपास करणार आहे. दरम्यान संपूर्ण 1000 किलो गांजा निश्चितच बीडमध्ये वापरला जाणार नव्हता. तर तो तिथून मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागात पाठवला जाणार होता का? याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply