नागपूर :  हिवाळी अधिवेशनात पोलिसांची पहिल्याच दिवशी अडचण, जेवण संपल्याने उपाशी राहण्याची वेळ

नागपूर : हिवाळी अधिवेशनाला नागपुरात आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र नेतेमंडळींच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची उपासमार सुरु असल्याचं चित्र समोर आलं आहे. पोलिसांसाठी असलेले जेवण संपल्याने अनेक पोलीस कर्मचारी उपाशी आहेत.

काही पोलीस सकाळपासून मोर्चाच्या बंदोबस्तावर होते. त्यामुळे अनेकांना जेवण मिळालं नाही. साम टीव्हीने यासंबंधीची बातमी दाखवल्यानंतर आता दुपारी चार वाजता जेवण मिळालं आहे. मागच्या वेळी देखील अशीच परिस्थिती पोलिसांवर उद्धभवली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अधिवेशनात ड्युटीवर तैनात करण्यात आलेल्या पोलिसांना आज पहिल्याच दिवशी अडचणींचा सामना करावा लागला. विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पोलिसांच्या जेवणाच्या स्टॉलवर जेवण अपूर्ण पडल्याने अनेक पोलिसांना उपाशी राहावे लागले. पोलिसांना 250 रुपयात 10 दिवसांच्या जेवणाचे कूपन देण्यात आले होते. मात्र कूपन घेऊन देखील जेवण कमी पडले होते.

राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी पोलिसांच्या या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. पोलिसांचा फक्त गैरवापर हे सरकार करत आहे. आता तर कहर झाला आहे. दिवसभर सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना चार वाजले तरी पोलिसांना जेवणाचा पत्ता नाही. अधिवेशनासाठी जो खर्च होतो तो पैसा मग जातोय कुठे? असा सवाल देखील विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply