नवी दिल्ली : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबवर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न, घटनेचा Video आला समोर

नवी दिल्ली: देशाला हदरवून सोडणाऱ्या दिल्ली हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याच्यावर तलवारीने हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पॉलिग्राफीनंतर तुरुंगात परत घेऊन जात असताना त्याच्या गाडीवर हा हल्ला झाला आहे.

श्रद्धा हत्येतील आरोपी आफताब पूनावाला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर दिल्लीतील एफएसएल कार्यालयाबाहेर तलवारी घेऊन आलेल्या लोकांनी हल्ला केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे. आफताबला पोलिसांच्या गाडीमध्ये बसवून जेलमध्ये नेण्यात येत होतं त्यावेळी हा प्रकार घडला. दरम्यान हल्ला केलेले कार्यकर्ते हे हिंदू सेनेचे असल्याचा दावा केला जात आहे.

एफएसएल लॅबमधून जेलच्या दिशेने जात असताना आफताब पोलिसांच्या ज्या गाडीत बसला होता त्यावर चढण्याचा प्रयत्न देखील यावेळी झाला. हे हल्लेखोर कोण आहेत याबद्दल अजून नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार ते हिंदू सेनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या हल्ल्यात आफताब पोलिसांच्या सुरक्षेत असल्याने बचावला आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “नवी दिल्ली : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबवर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न, घटनेचा Video आला समोर

  1. I amm iin fact happy tto glande aat his weblog poosts hich consists off lofs oof helplful facts,
    hanks for providing sych information.

    My homepage; xmxx

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *