नवी दिल्ली : जहांगीरपुरीत पुन्हा तणाव; पोलिसांवर दगडफेक, परिसराला छावणीचं स्वरुप

नवी दिल्ली : हनुमान जयंतीदिनी दिल्लीच्या जहांगीरपुरी इथं झालेल्या हिंसाचारानंतर आज पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या पत्नीची चौकशी आणि अटकेसाठी पोलीस जहांगीरपुरीत पोहोचल्यास पोलिसांच्या टीमवर दगडफेक करण्यात आली. यामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं. यानंतर पोलिसांची कुमक वाढवण्यात आल्यानं परिस्थीती नियंत्रणात आली.

दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीतील शोभायात्रेत शनिवारी दगडफेक झाल्यानंतर हिंसाचार झाला होता. या घटनेच्या चौकशीसाठी तपास पथकाची एक टीम सकाळी घटनास्थळी पोहोचली. या ठिकाणाहून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जाणार आहेत.

या घटनेनंतर २१ जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. सुमारे २१ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी रविवारी १४ आरोपींना कोर्टात हजर केलं. कोर्टानं यांपैकी १२ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तर गोळी चालवणारा आरोपी आणि आणखी एकाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply