पुणे - नवीन वीजजोड (Electricity Connection) देताना अंदाजपत्रकातील खर्च आणि निर्धारित केलेले सर्व्हिस कनेक्शन चार्जेस यामध्ये फरक आला, तर तो वसूल करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दिला आहे. एवढेच नव्हे, अशा प्रकारे ग्राहकांकडून आकारलेल्या फरकाची रक्कम परत करण्याचे आदेशही आयोगाने महावितरणाला दिले आहेत. त्यामुळे नवीन वीजजोड घेणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आकारलेली रक्कम परत मिळणार
१९ मार्च रोजी महावितरणने परिपत्रक काढून १.३ सुपरव्हिजन चार्जेस या पद्धतीने काम करण्याचा निर्णय घेतला. महावितरणने अंदाजपत्रकात निश्चित केलेल्या रकमेपेक्षा कमी खर्च ग्राहकाला आला, तर त्या फरकाची रक्कम संबंधित ग्राहकांकडून वसुल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा जास्त खर्च आला, तर तो खर्च महावितरणकडून ग्राहकाला दिला जात नव्हता. त्यामुळे नवीन वीजजोड घेणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होत होता. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या नाशिक विभागाने महावितरणच्या या परिपत्रकाला आव्हान देत वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली. त्यावर आयोगाने अशा प्रकारे फरकाची रक्कम आकारता येणार नाही, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात अशा प्रकारे नवीन वीजजोड देताना आकारलेली रक्कम ग्राहकांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
समजा, दहा सदनिकांची इमारत आहे. या इमारतीतील नागरिकांनी नवीन वीजजोड घेण्यासाठी अर्ज केला, तर त्या अर्जावरून महाविरणकडून निर्धारित केल्यानुसार एका वीजजोडसाठी सात हजार ६०० रुपये सर्व्हिस कनेक्शन चार्जेस याप्रमाणे दहा वीजजोडाचे ७६ हजार रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी, असे ८९ हजार ६८० रुपये खर्चाचे अंदाजपत्रक संबंधित ग्राहकांना दिले जाते. ही संपूर्ण रक्कम ग्राहकाने भरली, तर आवश्यक ती सर्व कामे करून महावितरणकडून संबंधित ग्राहकाला वीजजोड देण्यात येतो. मात्र, पैसे भरूनही वीजजोड मिळण्यास किती कालावधी लागेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे हेच काम ग्राहकाने १.३ सुपरव्हिजन चार्जेस या पद्धतीने करावयाचे ठरविले, तर महावितरणने दिलेल्या अंदाजपत्रकातील (८९ हजार ६८९) खर्चापेक्षा सरकारी मान्य ठेकेदाराकडून तुम्ही पन्नास हजार रुपयात हे काम करून घेतले. यामुळे ३९ हजार ६८९ रुपये तुमची बचत होत होती. परंतु, ही फरकाची रक्कम महावितरण ग्राहकांना भरण्यास भाग पडत असे. आयोगाच्या आदेशामुळे अशा प्रकरणात आता फरकाची रक्कम महावितरणला आकारता येणार नाही.
नवीन वीजजोड देण्यासंदर्भात महावितरणकडून १९ मार्च २०२१ रोजी एक परिपत्रक काढले होते. त्या परिपत्रकानुसार एखाद्या ग्राहकाला नवीन वीज जोड हवा असेल, त्यासाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक महावितरणकडून संबंधित ग्राहकाला दिले जाते. त्या अंदाजपत्रकातील कामे केली, तरच वीजजोड दिला जातो. मात्र, हा जोड देण्यासाठी महावितरणकडून दोन पद्धती निश्चित केल्या आहेत.
एका पद्धतीनुसार महावितरणकडून दिलेली संपूर्ण अंदाजपत्रकातील रक्कम महावितरणकडे जमा केली, तर महावितरण कडून वीजजोड देण्यासाठी असलेले सर्व साहित्य वापरून ते काम पूर्ण करून दिले जाते.
दुसऱ्या पद्धतीमध्ये अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार कामांसाठी येणारा खर्च करण्याची तयारी ग्राहकांची असेल, अशांकडून केवळ १.३ सुपरव्हिजन चार्जेस त्यावर १८ टक्के जीएसटी आकारून परवानगी दिली जाते.
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


