धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज; धनंजय मुंडेंना विश्रांतीची गरज, कुटुंबियांचे कार्यकर्त्यांना आवाहन

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना साेळी दिवसांच्या उपचारानंतर आज (गुरवार) ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील काही दिवस धनंजय मुंडे यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला वैद्यकीय अधिकारी यांनी दिला आहे.

तीन जानेवारीच्या मध्यरात्री धनंजय मुंडे यांच्या कारला परळी येथे अपघात घडला होता. यावेळी त्यांच्या छातीला जखमा झाल्याने त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर 16 दिवसांच्या उपचार करण्यात आले.
 
दरम्यान पुढील काही दिवस डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली असल्याने मुंबईतील निवासस्थानी काही दिवस विश्रांती घेऊन परळी येथे लवकरच सर्वांना भेटून पुन्हा जनसेवेत दाखल होणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन म्हटले आहे. दरम्यान पुढील काही दिवस मुंडे यांना सहकारी मित्र, कार्यकर्त्यांनी भेटायला येऊ नये सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुंडे यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
 
दरम्यान या काळात उपचार केलेले सर्व डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णालयातील कर्मचारी यांची विचारपूस करून काळजी व्यक्त केलेल्या सर्वांचे धनंजय मुंडेंनी आभार मानले. तसेच मान्यवर आणि समर्थकांचेही आभार मानले आहेत.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *