पुणे : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माने यांनी पुणे सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी राजस्थानमधील भरतपूर येथून आरोपीला अटक केली.
रिझवान अस्लम खान (वय २४, रा. ग्राम सिहावली महारायपूर, ता. नगर, जि. भरतपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार माने हे पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांना २३ जानेवारी रोजी फेसबुकद्वारे अनोळखी तरूणीचे मेसेज आले होते. त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
३१ जानेवारीला फेसबुकवर व्हिडिओ कॉल आल्यानंतर त्यांना संशय आला. परंतु त्यांना सतत आठवडाभर मेसेज येत होते. त्यामुळे त्यांनी रात्री दहाच्या सुमारास तो व्हिडिओ कॉल उचलला. काही सेंकदांसाठी तो कॉल सुरू राहिला. आरोपींनी माने यांच्या व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवून कॉल करुन भूरळ पाडण्याचा प्रयत्न केला.
आरोपीने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ कॉल माने यांना पाठविला. तसेच, एक लाख रुपये खंडणी न दिल्यास तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत माने यांनी पुणे सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी रिझवान खान याला राजस्थानच्या भरतपूर येथून अटक केली. आरोपीच्या मोबाईलमध्ये ९० अश्लील व्हिडिओ आढळून आले आहेत. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे-पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यास सायबर पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सेक्सस्टॉर्शनचा प्रकार ऐकून होतो. पण, मी या धमक्यांना बळी न पडण्याचे ठरवले. तरुणांना ब्लॅकमेल करून लुटले जात असून, असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. हा प्रकार खूपच भयानक आहे. पुणे पोलिसांचे मी आभार मानतो. अनवधानाने असा प्रकार घडल्यास नागरिकांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी.
शहर
- Vaishnavi Hagawane : हगवणेंचा आणखी एक पराक्रम, JSB जप्त करण्यासाठी आपले कर्मचारी पाठवले, बँक मॅनेजर म्हणाले..
- Manoj Jarange : फडणवीस विचित्र माणूस, आमचं त्यांचं शत्रुत्व नाही, पण...; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
- Vegetable Rate Hike : वांगी चिकनपेक्षाही झाली महाग; पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे दर वाढले
- Pune : सॉरी! माझी जगायची इच्छा संपली, हिंजवडीत २१ व्या मजल्यावरून IT इंजिनिअर तरूणीने घेतली उडी
महाराष्ट्र
- Sharad Pawar : राज ठाकरेंवर पवारांची थेट टीका; म्हणाले, सभांना गर्दी असते, पण मतं मिळत नाहीत
- Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा झटका, एकमेव नगरसेवक फोडला
- Love Triangle Crime : गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडने भरचौकात हत्या केली, तरूणावर सपासप वार
- Beed Crime : 'आम्हाला मुलगाच हवा होता', सासरच्या जाचाला कंटाळली, घराबाहेर काढलं, बीडच्या लेकीचा पुण्यात छळ
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Elon Musk : 'दोस्त दोस्त न रहा', एलोन मस्कचं डोनाल्ड ट्रम्पला चॅलेंज, थेट नवीन पार्टी काढली
- Youtuber : 'आप कमाल की माल, मन कर राह है दबा दू', युट्यूबरचा महिलेसोबतचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; शिवीगाळ अन्..
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ