दौंड येथील कुरकुंभ MIDCतून साडेपाच कोटींचे केमिकल चोरीला

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील इटर्निस फाईन केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या कॅटॅलिस्ट रूममधून अज्ञात चोरट्याने अमेरिकन कंपनीकडून आलेले 20 किलो रोडिअम ऑन ॲल्युमिना नावाचे एकूण 5 कोटी 47 लाख 20 हजार 345 रूपये किंमतीचे केमिकल चोरीला गेले असून यासंदर्भात दौंड पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दौंड पोलिसांनी इटर्निस फाईन केमिकल्स कंपनीच्यावतीने विष्णु बाजीराव डुबे ( रा.रक्षकनगर, गोल्ड, बिल्डींग नंबर बी-3 फलॅट नंबर 303, खराडी, पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माहिती दिली. फिर्यादीमध्ये 24/12/2020 ते 06/01/2022 या कालावधीत कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील इटर्निस फाईन केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या प्लाॅट नंबर डी/9/1,9/2,9/3 आणि डि/15 मधील कॅटॅलिस्ट रूममधून 24/12/2020 रोजी आलेले 1 कोटी 50 लाख 86 हजार 943 रूपये किंमतीचे 10 किलो आलेले जाॅनसन मॅथे नावाचे अमेरिकन कंपनीचे बाॅक्स त्याची एका किलोची किंमत 15 लाख 8 हजार 694 होती. तर 02/09/2021 रोजी आलेले रोडिअम ऑन ॲल्युमिना हे 10 किलो केमिकल त्याची किंमत 3 कोटी 96 लाख 33 हजार442 रूपये आहे. त्यांची प्रत्येक किलो किंमत रूपये 39 लाख63 हजार 344 रूपये प्रमाणे होती. ते जाॅनसन मॅथे नावाचे अमेरिकन कंपनीचे बाॅक्स होते. दोन्ही मिळून एकूण 5 कोटी 47 लाख 20 हजार 385 रूपये किंमतीची चोरी झाली. याप्रकरणी कंपनीच्यावतीने बुधवारी ( ता. 16 ) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखालील उपनिरीक्षक सुशिल लोंढे करीत आहेत.  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply