दिल्लीत पवार आणि मोदींची भेट, ED कारवाईनंतर घडामोडींना वेग

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच दिल्लीत मोठी खलबतं सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तांवर सक्तवासुली संचलनालयाने कारवाई केल्यानंतर राज्य विरुद्ध केंद्र संघर्ष आणखी शिगेला गेला आहे.

मात्र राऊत यांच्यावर कारवाई झाल्यानंतर संध्याकाळी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राऊत आणि नितीन गडकरींनी उपस्थिती लावली होती. सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवारांच्या एका बाजूला संजय राऊत आणि दुसऱ्या बाजूला गडकरी बसले होते. 

यानंतर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली आहे. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं कळतंय. हे दोन्ही नेते दिल्लीत भेटले की महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग येतो. सध्या हीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे.

काँग्रेस आमदारांनी नुकतीच सोनिया गांधी तसेच मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली. राज्यात काम न करणाऱ्या मंत्र्यांची पदं बदलण्यात यावी, असं त्यांनी सोनिया गांधींना सांगितल्याचं समोर आलं. यातच शिवसेनेवरची कारवाई आणि शरद पवार यांच्या बंगल्यावरील 'डिनर डिप्लोमसी' यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात १३ महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. तर देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याचं स्पष्ट झालंय.

एकीकडे ईडीकडून महाविकास आघाडी सरकारवरील नेत्यांवर कारवाई होत आहे. तर काल शरद पवार यांच्या बंगल्यावर शिवसेना आणि भाजपचे नेते उपस्थित होते. नीलम गौऱ्हे, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार, शिवसेनेचे मंत्री दादासाहेब भुसे यांनी पवारांच्या बंगल्यावर उपस्थिती लावली. महाविकास आघाडीतील अनेक मोठे नेते संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होते.

राऊतांच्या घरी चहापान झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी सर्वपक्षीय आमदारांनी हजेरी लावली. यात केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते. सध्या महाराष्ट्रातले आमदार प्रशिक्षणासाठी नवी दिल्लीमध्ये आहेत. यामध्ये भाजपचे आमदार देखील आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply