दिल्लीतील जहांगीरपुरी भागातील दगडफेक प्रकरणी चौथा FIR दाखल; गोळीबार करणारा आरोपी अटकेत

दिल्लीत जहांगीरपुरी भागामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांकडून वेगवान तपास आणि कारवाई सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी चौथा एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. सोमवारी पोलिसांनी आरोपी सोनू चिकना याला अटक करण्यात आली आहे. सोनू चिकनावर दगडफेकीवेळी गोळीबार केल्याचा आरोप आहे. दगडफेक आणि तोडफोडीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक व्यक्ती गोळीबार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

यानंतर पोलिसांनी कारवाई करत सोनू चिकनाचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत २२ आरोपींना पोलिसांनी अटक  केले आहेत. या २२ व्यतिरिक्त आणखी २ अल्पवयीन मुलांना देखील अटक करण्यात आली आहे. आरोपी सोनू चिकनाची अटक सर्वात महत्त्वाची असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी त्याचे वर्णन कुख्यात गुन्हेगार असे केले आहे. पहिली एफआयआर १६ एप्रिल दिवशी नोंदवण्यात आली होती. यामध्ये विविध गुन्हेगारी कलमांखाली खटला चालवण्यात आला आहे.

दुसऱ्या एफआयआरमध्ये परवानगीशिवाय मिरवणूक काढल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमा या आरोपी विरोधात पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी तिसरी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ज्या शस्त्राने सोनू गोळीबार करताना दिसत आहे. त्याच शस्त्रासह सोनू चिकना याला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. सोनू शेख उर्फ ​​सोनू चिकना याला आज रोहिणी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सोनू चिकनाच्या अटकेसह आतापर्यंत एकूण २२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अन्सार, अस्लम, जाहिद, शहजाद, मुख्त्यार अली हसन, मोहम्मद अली, अमीर, अक्सर, नूर आलम, जाकीर, अक्रम, इम्तियाज, अहिर, मोहम्मद अली, शेख सौरभ, सूरज, नीरज, सुकेन, सुरेश, सुजित सरकार आणि सलीम चिकना उर्फ सोनू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या २२ व्यतिरिक्त २ अल्पवयीन मुलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. सोमवारी ८ सदस्यांच्या पथकाने हिंसाचाराच्या ठिकाणाहून नमुने गोळा करण्यात आले आहेत. हिंसाचाराचा आरोप असलेल्या अन्सारचे आम आदमी पक्षाशी संबंध असल्याचा आरोप भाजपने केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply