दिल्लीतील एम्स रुग्णालयावर सायबर हल्ला; ३६ तासांपासून सर्व्हर निकामी झाल्यानं रुग्णांचे हाल

नवी दिल्ली :  देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक झाला आहे. या सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली असून रुग्णालयाची सर्व्हर निकामी झाले आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होतायत.

रुग्णालयाचं कामकाज ऑनलाईन बंद असून सध्या मानवी बळाद्वारे (मॅन्युअली) कामकाज सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 36 तासांपासून रुग्णालयाचे सर्व्हर डाऊन आहेत, यामुळे ओपीडीसह आपत्कालीन म्हणजेच इमर्जन्सी सेवा प्रभावित झाल्या आहेत. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

दिल्ली एम्स हे देशातील सर्वात प्रतिष्ठित रुग्णालय आणि संशोधन संस्था आहे. एम्स दिल्लीचा सर्व्हर दोन दिवस उलटूनही सुरळीत होऊ शकलेला नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव गुरुवारी संध्याकाळी एम्सचा लॅन इंटरनेट सर्व्हरही बंद करावा लागला. सध्या एम्स कॅम्पसमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा वापरली जात आहे.

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता भारतीय तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही काल, गुरुवारी एम्समध्ये पोहोचले होते. चीनकडून हा सायबर हल्ला झाला आहे का? या अॅंगलने याचा शोध घेतला जात आहे. एम्स व्यवस्थापनाने सायंकाळी उशिरा संगणक शाखेशी संबंधित दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. सूत्रांचं म्हणणं आहे की, आयटी मंत्रालयाशिवाय राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित इतर एजन्सी एम्सची यंत्रणा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply