नीना गुप्ता यांचा धक्कादायक खुलासा
बॉलिवूडमधील सर्वात बेधडक आणि शानदार, उत्तम अभिनेत्री असलेल्या नीना गुप्ता यांचं आयुष्य, त्यांचे स्ट्रगल बऱ्याच लोकांना माहीत आहेत. पण नुकतच त्यांनी आयुष्यातील काही अशा घटनांबद्दल सांगितलं जे ऐकून कोणीही हैराण होईल. माझी इच्छा नसतानाही मला छोट्या आणि काही वेळा खराब भूमिकाही कराव्या लागल्या. एवढंच नव्हे तर सेटवर प्रचंड गैरवर्तन सहन करावं लागलं, शिव्याही ऐकाव्या लागल्याच धक्कादायक खुलासा त्यांनी केला. मी माझ्या कारकिर्दीत असे अनेक चित्रपट केले आहेत ज्यांबद्दल मला काहीच प्रेम,आपुलकी वाटत नाही असंही त्या म्हणाल्या. “अनेकदा मी घरी येऊन देवाला प्रार्थना करायचे की तो चित्रपट कधीच प्रदर्शित होऊ नये” असाही मोठा खुलासा त्यांनी केला.
काय म्हणाल्या नीना गुप्ता ?
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नीना गुप्ता यांनी चित्रपटाच्या सेटवरील वागणुकीबद्दल अनेक गोष्टी उलगडल्या. ‘एका चित्रपटात, मी शक्ती कपूरच्या टोळीची फक्त एक अनामिक सदस्य होते, तिथे माझं काम म्हणजे, फक्त बाजूला उभं राहणं होतं’. मी अशा गोष्टी, अशी कामं केली, पण ती मनापासून नव्हे. परिस्थितीमुळे मला या गोष्टी करणं भाग पडलं, असंही त्यांनी नमूद केलं.
चित्रपटाच्या सेटवर ऐकाव्या लागल्या शिव्या
एवढंच नव्हे तर चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकाकडून चुकीची वागणूक मिळाल्याची आठवणही त्यांनी सांगितली. ‘ तुम्ही कधी विचारही करू शकणार नाही, पण सेटवर मला शिव्या ऐकाव्या लागल्या आहेत. काहीही चूक नसताना मला आई-बहिणीवरून शिव्या ऐकाव्या लागल्या. दिग्दर्शकानेच ते शब्द वापरले होते. पण मी तिथे अडकले होते, कारण मला पैसे (कमवायचे) होते ना. जर दुसरं काही (काम) मिळालं असतं तर मी हे नक्कीच केलं नसतं ‘ असंही त्यांनी सांगितलं.
अलीकडेच मला काही प्रोजेक्ट्स दिग्दर्शित करण्याची ऑफर मिळाली होती, पण सध्या मला त्या क्षेत्रात जायचे नाही कारण, मला वाटतंय की माझी अभिनय कारकीर्द चांगली चालली आहे. मला त्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे असं पुढे त्या म्हणाल्या.
कोणकोणत्या चित्रपटातं केलं काम ?
गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत असलेल्या नीना गुप्ता यांनी अनेक चित्रपटांत काम केलंय. त्यामध्ये ‘साथ साथ’, ‘गांधी’, ‘जाने भी दो यारों’, ‘मंडी’, ‘घर जमाई’, ‘खलनायक’, ‘एंथ’ आणि ‘मेरी बीवी का जवाब नहीं’ यांचा समावेश आहे. तर गेल्या काही वर्षांत त्यांनी ‘वीरे दी वेडिंग’, ‘मुल्क’, ‘बधाई हो’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’, ‘संदीप’ आणि ‘पिंकी फरार’, ’83’, ‘मिसेज चटर्जी व्हर्सेस नॉर्वे’, ‘मेट्रो इन दिनों’ तसेच ‘तू मेरी मैं तेरा…’ या चित्रपटांतही त्या दिसल्या होत्या.
टीव्ही आणि ओटीटीवर त्यांनी ‘खानदान’, ‘गुल गुलशन गुलफाम’, ‘चाणक्य’, ‘जुनून’, ‘सांस’, ‘सोन परी’, ‘जस्सी जैसी कोई नहीं’, ‘मेड इन हेवन’, ‘पंचायत’, ‘मसाबा मसाबा’ आणि ‘चार्ली चोप्रा’ सारख्या शोमध्येही काम केलं. नुकत्याच त्या ‘वध 2’ चित्रपटात दिसल्या होत्या.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


