… तोपर्यंत कुणाच्या बापाला घाबरायचं नसतं, अमोल कोल्हे यांनी दिले आव्हान

अभिनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या पुणे विद्यापीठातील भाषणाला काही संघटनानी विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठात प्रचंड बंदोबस्त नेण्यात आला आहे.आता थोड्यावेळापूर्वीच अमोल कोल्हे यांचे पुणे विद्यापीठात आगमन झाले असून त्यांनी यावेळी मीडियाशी बोलताना जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे छत्रपती मांडताय तोपर्यंत कुणाच्या बापाला घाबरायचं नसतं असे आव्हान देत व्याखान घेणारच अशी भूमिका मांडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांचे पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महराज यांच्या जीवनावर व्याख्यान ठेवण्यात आले आहे. या व्याख्यानाला एका संघटनेने विरोध केला आहे.अभिनेते अमोल कोल्हे यांनी मराठी मालिकात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा अभ्यासही केला आहे.त्यामुळे त्यांना या व्याख्यानाला बोलवण्यात आले आहे. मात्र एका संघटनेने विरोध केल्याने पुणे विद्यापीठ परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही आयकार्ड पाहून प्रवेश दिला जात आहे. सायंकाळी अमोल कोल्हे यांचे व्याख्यान असून त्यासाठी ते विद्यापीठात दाखल झाले त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *