तवांगमधील झटापटीवर अमित शाह यांचं मोठं विधान; काँग्रेसने चीनी दूतावासाकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप

 तवांगमध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीमुळे नियंत्रण रेषेवर (LAC) पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. ९ डिसेंबर रोजी झालेल्या झटापटीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले होते. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना ते म्हणाले की, काँग्रेसचा चीनबाबतचा दृष्टिकोन दुटप्पी आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात एक इंचही जमीन कोणी ताब्यात घेऊ शकत नाही. 2006-07 मध्ये काँग्रेसने चीनी दूतावासाकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. 

यावेळी माध्यमांशी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, विरोधकांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास चालू दिला नाही आणि मी या कृत्याचा निषेध करतो. तवांग संघर्षाच्या मुद्द्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत निवेदन करणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्र्यांनी स्पष्ट केल्यावर विरोधकांनी हे कृत्य केले. ते म्हणाले की जेव्हा मी प्रश्नोत्तराच्या तासाची यादी पाहिली आणि प्रश्न क्रमांक 5 पाहिल्यानंतर मला काँग्रेसची चिंता समजली. एक प्रश्न राजीव गांधी फाउंडेशनचा फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (FCRA) परवाना रद्द करण्याबाबत होता.

ते म्हणाले की, भारताची एक इंच भूमी कोणीही काबीज करू शकत नाही. ८ डिसेंबरच्या रात्री आणि ९ डिसेंबरच्या सकाळी आपल्या जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे मी कौतुक करतो. भारतीय सैन्याने काही वेळातच घुसखोरी करणाऱ्या सर्व चिनी सैनिकांचा पाठलाग करून आपल्या भूमीचे रक्षण केले. अमित शाह म्हणाले की, 1962 मध्ये काँग्रेसच्या काळात चीनने भारताची जमीन बळकावली होती.

9 डिसेंबरला चिनी सैनिक प्राणघातक शस्त्रांसह LAC ला बॅरिकेड करण्याच्या योजनेसह आले होते. भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये 3-4 ठिकाणी झटापटी झाल्या. चिनी सैनिक गस्त घालणाऱ्या वाहनांतून आले. एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्यासोबत कुंपण घालण्याचे साहित्यही आणले होते. चिनी सैनिकांकडे रेडिओ सेट, शील्ड स्पाइक आणि इलेक्ट्रिक बॅटन देखील होते. चिनी सैनिकांनी त्यांच्यासोबत जाड गाठी असलेली दोरी, शॉक देणारी पिस्तूल आणि खिळे लावलेली जाड काठीही आणली होती. या भागात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चिनी सैनिकांचे संपूर्ण नियोजन भारतीय सैनिकांच्या प्रत्युत्तरामुळे फसले आहे.

वास्तविक पाहता, चिनी सैनिक गस्त घालत असताना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पोहोचले आणि त्यांनी तेथे तात्पुरती बांधकामं सुरू केली. मात्र भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना तेथून हुसकावून लावले. 11 डिसेंबरला ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्यांची ध्वज बैठक झाली. तेव्हापासून परिस्थिती नियंत्रणात आहे. सन 2006 पासून चीनने जवळपास 15 ते 16 वेळा अशा कारवाया केल्या आहेत. प्रत्येक वेळी भारतीय लष्कराच्या तत्परतेमुळे त्यांना माघारी फिरावे लागले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply