डॉ. चंद्रकांत लहारिया यांचा कॉलम:तुमच्या मुलांना संरक्षण द्या,‎ पण आव्हानांना घाबरू नका

‎‎‎‎‎‎‎‎‎‎अलीकडच्या काळात जपानमधील ‘पंच'' नावाच्या‎माकडाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तो‎ प्राणी संग्रहालयात ठेवलेला 7 महिन्यांचा मकाक माकड‎ आहे. त्याची आई त्याला सोडून गेली होती. इतर माकडे ‎त्याला त्रास देत होती. त्याला दुःखी पाहून, ‎प्राणी संग्रहालयाच्या रक्षकाने त्याला एक सॉफ्ट टॉय‎ दिला. त्यानंतर ‘पंच'' सॉफ्ट टॉयला त्याच्या छातीशी ‎धरून फिरत होता. जणू काही त्याच्या शांत उपस्थितीत‎ सांत्वन मिळत होते. हे दृश्य संवेदनशील व अस्वस्थ‎ करणारे होते. एक सामाजिक प्राणी - निसर्गाने त्याला ‎सहवासासाठी तयार केलेला होता - त्याच्या भावनिक‎ गरजा पूर्ण करण्यासाठी खेळण्यावर तो अवलंबून होता.‎ एक डॉक्टर,पालकत्व आणि बाल विकासाच्या क्षेत्रात ‎‎सहभागी व्यक्ती म्हणून त्या दृश्याने मला दोन खोल ‎सत्यांची आठवण करून दिली. पहिले- विश्रांती, स्पर्श ‎‎आणि भावनिक सुरक्षिततेची गरज आपल्या जैविक ‎रचनेत खोलवर रुजलेली आहे. दुसरे म्हणजे- खेळणी‎- मग ती मानव असो वा माकड - भावना आणि बाल ‎‎विकास संतुलित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका‎ बजावतात. विकासात्मक मानसशास्त्रात सॉफ्ट टॉइज‎ही संक्रमणकालीन वस्तू मानली जातात. टेडी बेअर‎किंवा बाहुली मुलाला अवलंबित्व आणि स्वातंत्र्य‎यांच्यातील अंतर कमी करण्यास मदत करते. एखादे मूल‎झोपण्यापूर्वी त्यांच्या टेडी बेअरला मिठी मारते तेव्हा ते‎कमकुवतपणा दाखवत नाहीत; ते स्वतःला आराम‎देण्याचा सराव करत असतात. ते त्यांच्या पालकांच्या‎अनुपस्थितीतही सुरक्षिततेची भावना कशी राखायची हे‎शिकत असतात. भारतीय पालक बालविकासात‎अनेकदा दोन टोके गाठतात. एकीकडे आपण आपल्या‎मुलांच्या खूप जवळ असतो - वर्षानुवर्षे त्यांच्यासोबत‎झोपणे, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे व‎समस्या उद्भवण्यापूर्वी उपाय प्रदान करणे. दुसरीकडे‎आपण कधीकधी मुलाला खेळण्यांशी असलेल्या‎भावनिक जोडणीपासून लवकर दूर करण्याचा प्रयत्न‎करतो. त्याला बालिशपणा म्हणतो. दोन्हीही खरे नाहीत.‎ वयानुसार आणि संतुलित पद्धतीने वापरल्यास खेळणी‎मुलांच्या विकासासाठी एक शक्तिशाली साधन आहेत.‎एक वर्षापर्यंतच्या मुलांसाठी खेळणी संवेदी अनुभव‎विकसित करण्यास मदत करतात. एक ते तीन वर्षांच्या‎दरम्यान ते त्यांच्या कल्पनेत साथीदार बनतात. मूल‎त्यांना खायला घालते. झोपवते किंवा त्यांना फटकारते‎तेव्हा ते त्यांचे स्वतःचे अनुभव पुन्हा सादर करत‎असतात. तीन ते सहा वर्षांच्या दरम्यान, बाहुल्या,टेडी‎आणि कथेवर आधारित पात्रे भावनिक अभिव्यक्तीचे‎साधन बनतात. मूल म्हणते की "टेडी दुःखी आहे,’ तेव्हा‎ते स्वतःचे दुःख व्यक्त करत असतात. अशा परिस्थितीत‎संवेदनशील संवाद त्यांच्या भावनिक समजुतीला‎बळकटी देतो. पण "पंच’ कथेची दुसरी बाजू आहे.‎खेळणी मनाला शांतता देऊ शकतात. परंतु ती‎वास्तविक सामाजिक नातेसंबंध आणि जीवनातील‎आव्हानांची जागा घेऊ शकत नाहीत. भारतीय‎पालकत्वात ही एक त्रुटी दिसून येते. सर्वत्र त्यांच्यासोबत‎राहणे. प्रत्येक वादात हस्तक्षेप करणे. हे सर्व मुलांच्या‎निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या विकासाला विलंब करते. तर‎अनेक पाश्चात्य समाजांमध्ये, स्वायत्तता लवकर दिली‎जाते . दोन्ही मॉडेल परिपूर्ण नाहीत. भावनिक‎आधाराशिवाय जास्त स्वातंत्र्य दुर्लक्षित होऊ शकते‎आणि आव्हानांशिवाय जास्त संरक्षण कमकुवतपणा‎आणू शकते. मुले अडचणी दूर करून नव्हे तर लहान‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आव्हानांना तोंड देऊन परिपक्व होतात. बाल विकास‎संशोधन दर्शविते की खरी वाढ कठीण परिस्थितीत होते.‎व्यासपीठावर बोलणे, परीक्षेच्या चिंतेचा सामना करणे -‎मुलांना स्वतःचे कौशल्य आजमावू देणे - हे अत्यंत‎महत्त्वाचे आहे. पालकांसाठी संदेश स्पष्ट आहे : कृत्रिम‎अडचणी निर्माण करू नका किंवा प्रेम कमी करू नका;‎त्याऐवजी संतुलन राखा. एखादा लाडका टेडी बेअर‎मुलाला सांत्वन देत असेल तर समजून घ्या की तो‎त्यांच्या भावनिक विकासात एक साथीदार आहे. तसेच‎मुलांचे अनुभव वाढवा. त्यांना त्यांच्या शाळेच्या बॅगा‎स्वतः पॅक करू द्या. त्यांना खेळात हरल्याबद्दल थोडे‎दुःख वाटू द्या. ‘पंच'' आपल्याला आठवण करून देतो‎की सामाजिक गरजा पूर्ण न झाल्यास काय होते.‎(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे )‎ पालक म्हणून आपले काम मुलाच्या‎ बालपणातील असुविधांना पूर्णपणे काढून‎टाकणे नाही. उलट मुलास एक सुरक्षित‎आधार देणे होय. अर्थात मुलाने बाहेर‎जावे, अडखळावे, शिकावे आणि नंतर‎परत यावे. हे खरे पालकत्व होय.‎‎

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *