ठाणे: धमकी अन् बलात्कार प्रकरण: गणेश नाईकांना बेल की जेल ? कोर्टात आज निर्णय

ठाणे: महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तसेच धमकविल्या प्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी भाजपा आमदार गणेश नाईक यांनी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. याप्रकरणी काल बुधवारी (ता. 27) न्यायमूर्ती एन. के. ब्रम्हे यांच्यासमोर सुनावणी काल झाली होती. मात्र, या प्रकारणात दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर यावर आज दुपारी 2 निर्णय येणार आहे. त्यामुळे नाईक यांना जेल की बेल हे चित्र स्पष्ट होणार आहे. माजी मंत्री आणि भाजपा आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका 48 वर्षीय महिलेने अत्याचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात संबंधित महिलेने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, सदर महिला गणेश नाईक यांच्याबरोबर गेल्या 27 वर्षांपासून राहात होती. त्यांच्यापासून या महिलेला एक मुलगाही झालेला आहे. सध्या तो मुलगा 15 वर्षांचा आहे. याचबरोबर या महिलेने नाईक यांना मुलाचा स्वीकार करा असे म्हणल्यावर मुलाचा त्या महिलेला बंदूक दाखवून धमकविल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

यातील धमकी प्रकरणातील अर्जावर काल 27 एप्रिलला अंतिम सुनावणी घेणार असल्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर काल सुनावणी पार पडली होती. त्यामुळे आज कोर्ट आपला निकाल देणार आहे. नाईक यांच्यावर दाखल झालेले दोन्हीही प्रकारचे गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत त्यामुळे, कोर्ट आज काय निर्णय देतं हे पाहावं लागणार आहे. तर, या दोन्ही प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा याकरिता आ. गणेश नाईक यांच्यावतीने ठाणे सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. याबाबत आज ठाणे न्यायालयात सुनावणी होणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply