ठाकरेसेनेकडून भाजपचा पराभव, सय्यद इक्बाल परभणीचे महापौर, काँग्रेसची निर्णायक भूमिका

image

Parbhani Municipal Corporation mayor election results : परभणी महानगरपालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सत्ता स्थापन केली आहे. ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल यांनी १३ मतांनी भाजपचा पराभव केला. सय्यद इक्बाल यांना ३९ मते मिळाली तर भाजपच्या तिरुमला खिल्लारे यांना २६ मतांवर समाधान मानावे लागले. जनसुराज्य ३, राष्ट्रवादी काँग्रेस ११ आणि भाजपची १२ मते ठाकरेंच्या विरोधात पडली. परभणीत काँग्रेसने ठाकरेंच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यामुळे भाजपचा पराभव झाला.

महापौरपदाच्या निवडणुकीत याआधी काँग्रेसच्या नगरसेवकाने उमेदवारी मागे घेत ठाकरेंच्या शिलेदारांना पाठिंबा दिला. चंद्रपूरमध्ये भाजपने बहुमत नसताना सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे आता परभणीत काही चमत्कार करणार का? याची चर्चा सुरू होती. पण चंद्रपूरमधील चूक विरोधकांनी टाळत एकी दाखवली. परभणीत भाजपला १३ मतांनी पराभवाचा सामना करावा लागला.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *