जुन्या सवंगड्यासमोर विजयाचा आनंद; चेन्नईचा पहिला विजय

IPL 2022, CSK vs RCB : आयपीएलच्या गत विजेता चेन्नई सुपर किंग्जच्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा पाचव्या सामन्यात संपुष्टात आली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challangers) विरुद्धच्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात दमदार कामगिरी करुन दाखवत चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आपल्यातील धमक अजून बाकी असल्याचे दाखवून दिले. पहिल्यांदा बॅटिंग करताना शिवम दुबे 95 (46) आणि रॉबिन उथप्पाने 88 (50) केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईच्या संघाने निर्धारित 20 षटकात 4 बाद 216 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघातील फलंदाजांनी तीक्षणा आणि जडेजाच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. परिणामी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ 9 बाद 193 धावांपर्यंतच मजल मारु शकला. चेन्नई सुपर किंग्जने 23 धावांनी सामना जिंकत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला.

धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाची सुरुवातच खराब झाली. याआधी चेन्नईचा अविभाज्य भाग राहिला आणि यंदाच्या हंगामात बंगळुरुचे नेतृत्व करणारा फाफ ड्युप्लेसीस अवघ्या 8 धावांची भर घालून माघारी फिरला. विराट कोहलीला अवघ्या एका धावेची भर घालता आली. ग्लेन मॅक्सवेलनं संघाचा डावा सावरण्याचे संकेत दिले. पण जडेजाने त्याचा काटा काढला. शहाबाज अहमद 41 धावा, पदार्पणाचा सामना खेळणारा सुयश प्रभुदेसाई 34 धावा आणि दिनेश कार्तिक याने केलेल्या 34 धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. चेन्नईकडून महिश तीक्षणा याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याला कर्णधार रविंद्र जडेजाची उत्तम साथ मिळाली. फलंदाजीत अपयशी ठरलेल्या जडेजाने आरसीबीच्या तीन गड्यांची शिकार केली. याशिवाय ड्वेन ब्रावो आणि मुकेश चौधरी यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply