
पीटीआय, बाली : ‘‘जगात भू-राजकीय संघर्षांचा तणाव असताना, आर्थिक मंदी आणि अन्न-इंधनाची वाढती दरवाढ भेडसावत असताना ‘जी-२०’ या राष्ट्रगट अध्यक्षपदाची सूत्रे भारताकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचे जी-२० गट अध्यक्षपद सर्वसमावेशक, कृतिशील, निर्णायक व महत्त्वाकांक्षी असेल,’’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. १ डिसेंबरपासून भारत ‘जी-२०’चे अध्यक्षपद अधिकृतरीत्या स्वीकारणार आहे. ‘जी-२०’ची आगामी शिखर परिषद ९ आणि १० सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.
इंडोनेशियात बाली येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय जी-२० राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेच्या समारोपात भारताकडे इंडोनेशियाकडून या गटाचे अध्यक्षपद सोपवण्यात आले. या वेळी मोदी म्हणाले, की जी-२० भारत आपल्या अध्यक्षपदाच्या काळात येत्या वर्षभरात नवनवीन कल्पना राबवणे व सामूहिक कृतिशीलता गतिमान करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडेल. महासाथीच्या दीर्घकालीन दुष्परिणामांशी जग झुंजत असताना भारत ‘जी-२०’ची जबाबदारी घेत आहे. भारताचे हे अध्यक्षपद प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. जी-२० संदर्भातील विविध बैठकांचे आयोजन भारतातील विविध राज्यांतील शहरांत केले जाईल. त्यामुळे आमच्या पाहुण्यांना भारतातील अद्भुत विविधता, सर्वसमावेशक परंपरा आणि सांस्कृतिक समृद्धीचा अनुभूती येईल. आपण सर्व जण ‘लोकशाहीची जननी’ असलेल्या भारतात होणाऱ्या या अनोख्या उत्सवात सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे. आपण ‘जी-२०’ सकारात्मक जागतिक बदलाचे एक स्फूर्तिदायक व्यासपीठ बनवू. भारत यासाठी प्रमुख प्रवर्तक म्हणून सक्रिय असेल.
मोदींनी या वेळी ‘जी-२०’ साठी प्राधान्यक्रमाची सूची सादर केली. ते म्हणाले, की आगामी वर्षांत सामूहिक कृतीला गती देण्यासाठी जागतिक प्रमुख प्रवर्तक म्हणून भारत काम करेल. नैसर्गिक संसाधनांवर मालकीची भावना आज संघर्षांला जन्म देत आहे. तेच पर्यावरणाच्या दुर्दशेचेही मुख्य कारण बनले आहे. आपल्या वसुंधरेच्या सुरक्षित भविष्यासाठी विश्वस्त भावनेतून केलेले उपाय प्रभावी ठरतील. पर्यावरणपूरक जीवनशैली (लाइफस्टाइल फॉर एन्व्हायर्नमेंट) मोहीम यात मोठे योगदान देऊ शकते. शाश्वत जीवनशैलीला जनचळवळ बनवणे, हाच त्याचा उद्देश आहे.
‘एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य!’
विकासाचे फायदे सार्वत्रिक आणि सर्वसमावेशक असावेत, असे सांगून मोदी म्हणाले, की आम्हाला विकासाचे फायदे अवघ्या मानवजातीपर्यंत पोहोचवायचे आहेत. त्यासाठी करुणा आणि एकात्म भाव गरजेचा आहे. तसेच महिलांच्या सहभागाशिवाय जागतिक विकास शक्य नाही. ‘जी-२०’च्या माध्यमातून शांतता आणि सौहार्दाचा प्रभावी संदेश द्यायचा आहे. हे सर्व प्राधान्यक्रम पूर्णपणे भारताच्या ‘जी-२०’ अध्यक्षपदाच्या ‘एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य’ या सूत्रात अंतर्भूत आहे.
विविध नेत्यांशी चर्चा
बाली येथील ‘जी २०’ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राष्ट्रांच्या प्रमुखांशी चर्चा केली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जर्मनीचे चान्सलर ओलाफ श्कोल्झ, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जपानचे पंतप्रधान फ्युमिओ किशिदा, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी मोदींनी संवाद साधला.
जाहीरनाम्यावर रशिया-युक्रेन संघर्षांचे सावट
जी-२० गटाच्या बाली शिखर परिषदेच्या जाहीरनाम्यात बुधवारी रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात या राष्ट्रगट सदस्यांत मतभेद असल्याचे कबूल करण्यात आले. मात्र, या संघर्षांत अडकलेल्या नागरिकांच्या संरक्षणासह आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन एकमताने करण्यात आले. सप्टेंबरमध्ये झालेल्या शांघाय सहकार संघटनेच्या शिखर परिषदेच्या व्यासपीठावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतिन यांना उद्देशून ‘सध्याचे युग युद्धाचे नाही’ असे सांगितले होते. या जाहीरनाम्यात हेच वाक्य उद्धृत केले आहे.
या शिखर परिषदेच्या जाहीरनाम्यात ‘जी-२०’ दोन गट पडल्याचे प्रतिबिंब उमटले आहे. या शिखर परिषदेच्या समारोपातील या जाहीरनाम्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत घेतलेल्या भूमिकेचा सदस्य राष्ट्रांनी पुनरुच्चार केला. बहुतेक सदस्य राष्ट्रांनी युक्रेनमधील युद्धाचा तीव्र निषेध केला. मात्र, आपापल्या संदर्भात परिस्थिती समजून घेऊन याबाबत काही राष्ट्रांची ‘वेगळी मते’असल्याचेही नमूद केले आहे. जी-२० गटाचे अध्यक्षपद आणि शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणाऱ्या इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी या परिषदेत रशिया-युक्रेन संघर्षांच्या वादग्रस्त मुद्दय़ावर चर्चा झाली. या शिखर परिषदेस पंतप्रधान मोदींसह, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आदी महत्त्वाच्या राष्ट्रांचे प्रमुख सहभागी झाले होते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शिखर परिषदेस आपल्या देशाचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्रमंत्री सेर्गेई लावरोव यांना पाठवले होते.
शहर
- केवायसी (KYC) अपडेट बंधनकारक! लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई.
- लोकल प्रवास अधिक वेगवान अन् सुरक्षित होणार! दादर रेल्वे स्थानकात 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग'चे काम फत्ते.
- नीट परीक्षा घोटाळ्यात सर्वात मोठा खुलासा! विद्यार्थ्यांच्या वह्यांमध्ये सापडले हाताने लिहिलेले 'लिक्ड' प्रश्न.
- नवी मुंबई विमानतळ वाद: सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आंदोलकांना सुनावले खडे बोल.
महाराष्ट्र
- केवायसी (KYC) अपडेट बंधनकारक! लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई.
- लोकल प्रवास अधिक वेगवान अन् सुरक्षित होणार! दादर रेल्वे स्थानकात 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग'चे काम फत्ते.
- नीट परीक्षा घोटाळ्यात सर्वात मोठा खुलासा! विद्यार्थ्यांच्या वह्यांमध्ये सापडले हाताने लिहिलेले 'लिक्ड' प्रश्न.
- नागपुरात भीषण अपघात! भरधाव आयशर ट्रक पलटी; कष्टाची भाकर शोधायला निघालेल्या तीन मजुरांवर काळाचा घाला.
गुन्हा
- लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने २५ वर्षीय पंजाबी गायिका इंदर कौरची बंदुकीच्या अणीवर हत्या; ६ दिवसांनंतर कालव्यात सापडला मृतदेह!
- वसई-विरार मेट्रो मार्गिकेवर तीव्र आक्षेप! पूर्वेकडे झुकलेल्या नव्या मार्गामुळे पश्चिम पट्टा डावलल्याचा आरोप.
- एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, शेवटी उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला!
- पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष! विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाला १० वर्षांची सक्तमजुरी.अहिल्यानगर न्यायालयाचा कडक निर्णय: जादूटोण्याच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदूबाबाला तुरुंगवास आणि मोठा दंड
राजकीय
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
इतर
- आजचे राशिभविष्य (१९ मे २०२६): आज अंगारक संकष्टी चतुर्थी; श्री गणेशाच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य!
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
मनोरंजन
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
- खलनायिकांची हातमिळवणी! अनिका आणि समायरा रचणार दुष्ट कारस्थान; कमळी अन् शर्वरी संकटात.
- "मी पीआर आणि मार्केटिंगमध्ये कमी पडले!" भूमिका चावलाने २५ वर्षांच्या अनुभवानंतर व्यक्त केली मनातील खंत!
- अशोकमामा आणि निवेदिता सराफ यांच्या पारंपरिक लूकने वेधलं जगाचं लक्ष; 'त्या' एका कृतीने जिंकली मनं!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी मुंबई विमानतळ वाद: सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आंदोलकांना सुनावले खडे बोल.
- भारताची 'स्लीपर वंदे भारत' जगात सर्वात स्वस्त! चीन, अमेरिका आणि जपानमधील हायस्पीड ट्रेनचे तिकीट दर ऐकून थक्क व्हाल
- स्वतःचा जन्म स्वतःच देणाऱ्या 'सुपर एआय'साठी अब्जावधींचा निधी; काय आहे 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'?
- इराणच्या सरकारी टीव्ही चॅनेलवर थरार! लाईव्ह शोमध्ये न्यूज अँकरने थेट युएईच्या झेंड्यावर चालवली गोळी; व्हिडिओ व्हायरल






















Subscribe to my channel



