बीड : जीप- ट्रकचा भीषण अपघात; 2 जण गंभीर जखमी, जीपचा चक्काचूर

बीड : बीडच्या केज- कळंब महामार्गावर ट्रक आणि जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात जीपच्या चालकासह दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर बोलेरो गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. हा अपघात बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या साळेगाव परिसरात झाला.

साळेगाव परिसरात बोलेरो जीप (क्र. एमएच- 20, डिजे- 9563) या गाडीला ऊस बॅगसची वाहतूक करणाऱ्या ट्रक (क्र. एमएच 09, सीए 4590) ने समोरून जोराची धडक दिली. यात बोलेरो जीप चालक सोनू अन्सारी शेख (वय 25), नशीर बशीर शेख (वय 36) दोघे रा. थेटेगव्हाण (ता. धारूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित जखमींवर अंबाजोगाई आणि लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान ट्रक चालक रविंद्र महादेव रुपनर (रा. नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूर) याच्यासह अपघातातील ट्रक केज पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *