जम्मूच्या पोराचा वेग वाढतोय! 153.3 kmph स्पीडचा नवा रेकॉर्ड

Fastest Ball in IPL 2022 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात जम्मू काश्मीरचा पठ्य़ा आपल्या चेंडूतील वेगाची झलक दाखवून देताना दिसतोय. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यातउमरान मलिकनं  आपल्याचं रेकॉर्डमध्ये सुधारणा करत यंदाच्या हंगामातील सर्वात जलद गतीचा चेंडू टाकल्याचे पाहायला मिळाले. सनरायझर्स हैदराबादच्या  या गोलंदाजाने जवळपास 150 kmph पेक्षा अधिक वेगाने चेंडू फेकले. आपल्या 4 षटकांच्या कोट्यात गुजरात विरुद्ध त्याने 153. 3 kmph इतक्या वेगाने चेंडू फेकल्याचे पाहायला मिळाले. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचा तो सर्वात जलद गतीचा चेंडू ठरलाय. (Fastest Ball in IPL 2022 Umran Malik Clocks 153.3 kmph During SRH vs GT Match)

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात 7 व्या षटकात केन विल्यमसन याने भारताच्या नवोदित जलदगती गोलंदाजाच्या हाती चेंडू सोपवला. आपल्या स्पेलमधील पहिलाच चेंडू त्याने बाउन्सर फेकला. हा चेंडू हार्दिक पांड्याच्या हेल्मेटवर जोरात आदळल्याचे पाहायला मिळाले. पुढे कोणी असला तरी वेग कमी होणार नाही तर त्यात आणखी भर घालणार याचे संकेतच त्याने हा चेंडू फेकून दिले. सातत्याने तो 150 किमीप्रति तास पेक्षा अधिक वेगाने चेंडू फेकताना पाहायला मिळाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply