छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकावरून अजित पवारांची शिंदे सरकारवर टीका; म्हणाले, “इतकं खालच्या पातळीचे राजकारण…”

राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. शिंदे सरकारकडून वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक विकासासाठी मंजूर झालेल्या निधीला या सरकारने स्थगिती दिली, असा आरोप अजित पवार यांनी केला.

छत्रपती संभाजी महाराजांकडे एक शौर्य गाजवणारा राजा म्हणून आपण बघतो. महाविकास आघाडी सरकारने वढू-तुळापूर येथे त्यांचे स्मारक बनवण्याचे ठरवले होते. या स्मारकासाठी महाविकास आघाडी सरकारने निधीही मंजूर केला होता. त्याचा २६५ कोटींचा आराखडादेखील तयार झाला होता. मात्र, हा निधी राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. तसेच शाहू महाराजांच्या स्मारकासाठीही निधी दिला होता, तो देखील रद्द करण्यात आला आहे.

शिंदे फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या काळातली अनेक मंजूर विकासकामे स्तगित करण्याचे काम सुरु आहे. ही कामे काही आमदारांच्या घरातली नव्हती. ही विकासाची कामे होती, इतकं खालच्या पातळीचे राजकारण महाराष्ट्रात कधीही झाले नव्हते, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात वढू-तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक विकासासाठी निधी मंजूर करून करण्यात आला होता. त्यासाठीचा २६५ कोटी रुपयांचा आरखडाही तयार करण्यात आला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply