चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ९ वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल

उल्हासनगर : साडेचार वर्षाच्या मुलीवर नऊ वर्षाच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत संबंधित मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. 

पीडित अल्पवयीन मुलगी कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटूंबासह राहते. तिच्याच शेजारी नऊ वर्षाचा मुलगा राहत असून त्याने तीन एप्रिलला दुपारच्या सुमारास खेळण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला घराच्या मागच्या बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

त्यानंतर काही दिवसांनी पीडित मुलीला लैंगिक अत्याचारामुळे त्रास झाल्याने तिच्याकडे आईने चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर १५ एप्रिलला पीडितेच्या आईने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन शेजारी राहणाऱ्या नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलाविरोधात तक्रार दिली. संबंधित मुलावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी दिली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *