कधीकधी काही घटना आपल्याकडून विशेष प्रतिसादाचीमागणी करतात. जागतिक युद्धे, अण्वस्त्रांचा शोध आणिशीतयुद्धाच्या वेळी असेच झाले होते. जनरेटिव्हएआयलासुद्धा मी याच श्रेणीत ठेवतो. असे असूनहीएआयवर होणारी चर्चा अनेकदा वेगवेगळ्या चौकटीतविभागलेली असते. तंत्रज्ञ या मुद्द्यावर नक्कीच बरोबरआहेत की एआय सर्वकाही बदलेल- आणि वेगानेबदलेल. पारंपरिक धोरणात्मक आराखडा त्याच्याशीपाऊल जुळवू शकत नाही. पण ज्याप्रमाणे युद्ध केवळसेनापतींवर सोडले जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणेएआयलासुद्धा त्याच्या शोधकर्त्यांच्या भरवशावर सोडलेजाऊ शकत नाही- मग ते कितीही प्रतिभावान काअसेनात. बहुतेक एआय तंत्रज्ञ आणि उद्योजक अत्यंत आशावादीआहेत. ते वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतिकारी प्रगती, शारीरिककष्टाचे निर्मूलन, उत्पादकतेत तीव्र वाढ आणि जागतिकसमृद्धीची कल्पना करतात. ते अशा परिणामांची अपेक्षाकरतात कारण त्यात त्यांना नफ्याची शक्यता दिसते. पणत्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या क्षमतेवर त्यांचा अढळ विश्वासआहे, हेही एक कारण आहे. नुकतीच मी एका प्रतिभावानतरुण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी चर्चा केली, ज्यांच्याएआय स्टार्टअपचे मूल्य आधीच अनेक अब्ज डॉलर्सवरपोहोचले आहे. जेव्हा त्यांना विचारले गेले की, एआयडीपफेक आणि चुकीच्या माहितीची समस्या त्यांनाभेडसावते का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले: “मुळीच नाही.तुम्हाला फक्त हे तपासायचे आहे की एखादी गोष्टविश्वसनीय स्रोताकडून आली आहे का.” पण हे शक्यआहे का? जेव्हा त्यांना एखादा फोटो, दस्तऐवज,ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ पाठवला जाईल, तेव्हाहे तथाकथित विश्वसनीय स्रोत ते खरे आहे की नाही हेकसे ओळखतील? आणि जेव्हा अशा हजारो प्रतिमाकिंवा व्हिडिओ येतील, ज्यातील प्रत्येक दुसऱ्याचा खंडनकरत असेल, तेव्हा ते काय करतील? सोशल मीडियावरप्रसिद्ध झालेली कोणतीही सामग्री खरी आहे की नाही हेआपल्याला कसे कळणार? आणि जेव्हा बातम्यांच्यास्रोतांनाही प्रत्येक गोष्टीच्या सत्यतेची कष्टपूर्वक तपासणीकरावी लागेल, तेव्हा ते समकालीन आणि फायदेशीर कसेराहतील? अचूक भाकिते करण्यात मुख्य प्रवाहातीलअर्थशास्त्रज्ञांची कामगिरीही निराशाजनक राहिली आहे.त्यांनीच मोठ्या विश्वासाने आपल्याला सांगितले होते कीजागतिक करणाचा सर्वांना फायदा होईल; नियम कमीकेल्याने वित्तीय संकट निर्माण होणार नाही; विकासाचेअर्थशास्त्र आफ्रिकेच्या समस्या सोडवेल आणिआपल्याला मक्तेदारीबद्दल काळजी करण्याची गरजनाही. पण मग भ्रष्टाचाराची समस्यादेखील आहेच. यावर्षांमध्ये अनेक प्रमुख अर्थशास्त्रज्ञांच्या उत्पन्नाचा मोठावाटा कॉर्पोरेट देयकांमधून आला आहे. नक्कीच, काहीअपवाद आहेत. अॅन्थ्रोपिकचे मुख्य कार्यकारी अधिकारीडारियो अमोदेई यांनी एआयच्या संधी आणि धोके यादोन्हीबद्दल समज आणि प्रामाणिकपणा दाखवला आहे.अर्थशास्त्रातील नोबेल विजेते सायमन जॉन्सन यांनी एकालेखात सांगितले होते की कशा प्रकारे अमेरिकन वित्तीयउद्योगाने फेडरल धोरणावर ताबा मिळवून मंदीला जन्मदिला होता. पण अर्थशास्त्रज्ञांची एकूण कामगिरी विश्वासनिर्माण करत नाही, विशेषतः तेव्हा, जेव्हा अनेकअर्थशास्त्रज्ञ या तंत्रज्ञानाचे संभाव्य फायदे आणि धोके-दोन्ही कमी लेखताना दिसतात. मी एक खास गोष्ट लक्षात घेतली आहे. मी जितक्याहीश्रेष्ठ एआय संस्थापकांना भेटलो आहे, त्यापैकी अनेकपदवी किंवा पदवीपूर्व स्तरावरच शिक्षण सोडून आलेलेआहेत (खरोखर, 200,000 डॉलरच्या थेईलफेलोशिपसाठी तर ही अट आहे की प्राप्तकर्त्यांकडेविद्यापीठाची पदवी नसावी!). याउलट, पारंपरिकधोरण-निर्मिती एका जड, नोकरशाही यंत्रणेवर अवलंबूनअसते, ज्याची मोडकळीस आलेली यंत्रणा एआयसमोरकुठेच टिकत नाही. नक्कीच, आपण विद्यापीठे, विचारगट किंवा सरकारी धोरण-निर्मितीची यंत्रणा तर संपवूशकत नाही. पण असाधारण परिस्थितीत असाधारणप्रतिसादाची अपेक्षा करतो. अनेक धोरणात्मक मुद्द्यांवरसंथ आणि पारंपरिक प्रक्रिया कदाचित स्वीकारार्ह असेल-पण एआयच्या बाबतीत तसे करता येणार नाही.(@प्रोजेक्ट सिंडिकेट)
हे पण वाचा-
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


