कुकींग ऑईल वापरुन विमानाचं यशस्वी उड्डाण; तीन तासांचा केला प्रवास

जगभरात एकूणच इंधनाचा तुटवडा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. दुसरीकडे जागतिक इंधनाचे दर दिवसादिवसाला वाढतच आहेत. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक वेगळा आणि अनोखा प्रयोग पहायला मिळाला आहे. जगात पहिल्यांदाच जगातील सर्वांत मोठ्या पॅसेंजर एअरलाईन्सने तीन तासांचा प्रवास पूर्ण केला आहे. तुम्ही म्हणाल, मग यात काय वेगळं आहे? तुम्हाला धक्का बसेल मात्र, या विमानामध्ये नेहमीचं पेट्रोल न वापरता चक्क कुकींग ऑईल वापरण्यात आलं होतं. 

या एअरबसने चार रोल्स-रॉइस ट्रेंट 900 इंजिनापैकी एक वापरुन टुलुस, फ्रान्स, बेसमधून चाचणी A380 डबलडेकर जेटने उड्डाण केलं आहे. यामध्ये 100 टक्के शाश्वत असे विमानाचे इंधन परण्यात आलं होतं. हे इंधन स्वयंपाकाच्या तेलापासून तसेच कचऱ्यापासून बनवलेले आहे. या विमानात 27 टन Sustainable Aviation Fuel वापरण्यात आलं होतं. हे इंधन CO2 चे उत्सर्जन 80 टक्क्यांपर्यंत कमी करते. याची निर्मिती टाकाऊ तेल आणि चरबी तसेच हिरव्या भाज्या-पालेभाज्या आणि घरगुती स्वयंपाकाचा कचरा आणि गैर-खाद्य पिकांपासून बनवले जाऊ शकते.

सस्टेनेबल एविएशन फ्यूअल अर्थात शाश्वत विमानाचे इंधन वापरुन यशस्वीपणे उड्डाण करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. वाइड-बॉडी A350 तसेच सिंगल-आइसल A319neo ने मार्च 2021 मध्ये अशाच पद्धतीने उड्डाण केलं होतं. त्यामुळे या एअरबसला आता आशा आहे की, किमान या दशकाच्या अखेरीपर्यंत SAF वरचालण्यासाठी त्यांचे सर्व उड्डाणे प्रमाणित केली जातील.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply